Ajit Pawar Pune Election 2026: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Pune Municipal Election 2026) पक्षाचे हमीपत्र जाहीर केले. या हमीपत्रात पुणे शहराच्या विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर पक्षाची भूमिका आणि आगामी काळातील योजना सविस्तरपणे मांडण्यात आल्या. मोफत प्रवास, वाहतूक कोंडीवर उपाय, पायाभूत सुविधा आणि विकासाचे मोठे दावे करत अजित पवारांनी पुणेकरांना आश्वासनांची मोठी स्वप्नं दाखवली. मात्र, याच वेळी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत (Pune Crime) विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी गांभीर्याने भूमिका न मांडता उडवाउडवीची उत्तरं देत विषय टाळल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

पुण्याचा वाहतूक कोंडीचा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे, तितकाच गंभीर प्रश्न शहरातील वाढती गुन्हेगारीही आहे. कोयता गँग, टोळी युद्ध, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या आणि दहशतीमुळे पुणे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात चर्चेत आले आहे. अशा पार्श्वभूमीवर, पुण्याच्या पालकमंत्र्यांकडून गुन्हेगारीवर ठोस भूमिका अपेक्षित असताना अजित पवारांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  

Ajit Pawar Pune Election 2026: आंदेकर कुटुंबाच्या उमेदवारीवर प्रश्न 

विशेष म्हणजे, पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीशी संबंधित कुटुंबातील दोन सदस्यांना उमेदवारी देण्यात आल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या दोघींनाही आयुष कोमकर हत्या प्रकरणात अटक झाली असून त्या सध्या तुरुंगात आहेत. अशा पार्श्वभूमीवर, तुरुंगात असलेले उमेदवार निवडणूक लढवत असताना त्यावर पक्षाची भूमिका काय? असा थेट प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला.

Ajit Pawar Pune Election 2026: प्रश्न विचारताच ‘उडवाउडवी’ची उत्तरं

शहरातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांबाबत प्रश्न विचारताच अजित पवारांनी हा मुद्दा गांभीर्याने न घेता उडवाउडवीची उत्तरं देऊन विषय थांबवला. यामुळे “पुण्यातील गुन्हेगारी हा गंभीर प्रश्न नाही का?” असा सवाल उपस्थित झाला आहे. ज्या गुन्हेगारीमुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यावर पालकमंत्री म्हणून स्पष्ट भूमिका मांडणं ही त्यांची जबाबदारी असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

Ajit Pawar Pune Election 2026:  महिन्यात तीन-तीन खून

पुण्यात सध्या रस्त्यावरच हत्या होत आहेत, एका महिन्यात टोळी संघर्षातून तीन-तीन खून होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. कोयता गँगसारख्या टोळ्यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. अशा परिस्थितीत शहराचा कारभार पाहणारे आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार गुन्हेगारीबाबत इतकं हलकं उत्तर कसं देऊ शकतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Ajit Pawar Pune Election 2026:  गुन्हेगारांना अप्रत्यक्ष पाठबळ?

अजित पवारांच्या उत्तरामुळे अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. गुन्हेगारीवर बोलणं टाळणं म्हणजे गुन्हेगारांना अप्रत्यक्ष पाठबळ देणं आहे का? गुन्हेगारीचं उदात्तीकरण केलं जात आहे का? की या विषयावर बोलणंच टाळायचं आहे? असे अनेक प्रश्न आता पुणेकरांमध्ये चर्चिले जात आहेत.

आणखी वाचा 

Ajit Pawar Pune Election 2026: अजितदादांची लाडकी बहीण योजनेला मागे टाकणारी घोषणा, पुणेकरांना मेट्रो, बस प्रवास मोफत, जाहीरनाम्यातलं गेमचेंजर आश्वासन