Pune Zilla Parishad and Panchayat Election 2026:  राज्यातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी (Pune Zilla Parishad Election 2026) पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीने विशेष स्ट्रॅटेजी आखली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसकडून घड्याळ आणि तुतारी वाजविणारा माणूस या पक्ष चिन्हांचा सोयीनुसार वापर करण्यात येणार आहे. जिथे जे चिन्ह फायद्याचं ठरेल तिथे ते चिन्ह वापरून उमेदवार उभे केले जाणार, अशीमाहितीसमोरआलीआहे.

Continues below advertisement

Ajit Pawar Sharad Pawar NCP: दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकत्र बैठक, स्ट्रॅटर्जी ठरली, अमोल कोल्हेंवर विशेष जबाबदारी

दरम्यान, महापालिका निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र बैठक करुन ही स्ट्रॅटर्जी ठरवली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत आणि या उमेदवारांची जबाबदारी तुतारीच्या चिन्हावर खासदार म्हणून निवडून आलेल्या डॉक्टर अमोल कोल्हेंवर असणार आहे. तर शेजारच्या आंबेगाव तालुक्यात मात्र घड्याळ आणि तुतारीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. पुणे जिल्ह्यात आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमधे देखील घड्याळ आणि तुतारी वाजविणारा माणूस अशा दोन्ही चिन्हांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात पवारकाका-पुतण्यानेअर्थातशरदपवारआणिअजितपवारांनीमिळूनहिनवीआणि विशेष स्ट्रॅटेजी आखल्याचीमाहितीआहे. मात्रयासमीकरणाचाफायदादोन्हीराष्ट्रवादीलाकितपतहोतोय, हेपाहणेमहत्वाचेठरणारआहे.

Continues below advertisement

महापालिका निवडणुकीमध्ये झालेल्या दयनीय अवस्थेनंतर दोन्ही पक्षांमधील मत विभाजन टाळण्यासाठी घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जेष्ठ नेते जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांची एकत्रित बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी त्यांना अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केल्याची माहिती आहे. मत विभाजन टाळून एकत्र लढल्यास फायदा होईल अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून घेतली जात आहे. दरम्यान चार दिवसांपूर्वीच म्हणजेच 16 जानेवारी पासून राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्शवभूमीवर निवडणुकांचेसमीकरणजुळवण्यालावेगलेआहे.

इतरमहत्वाच्याबातम्या