Ajit Pawar On Sharad Pawar: बारामतीच्या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कल केली होती. शरद पवार गटाचे आणि महाविकास आघाडीचे बारामतीमधील उमेदवार युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये रुमाल काढत, डोळे फुसत शरद पवार यांनी अजित पवार यांची (Ajit Pawar) भर सभेत नक्कल केली. यानंतर सभेसाठी उपस्थित असणाऱ्यांनी एकच जल्लोष केला. शरद पवारांनी केलेल्या या नक्कलबाबत आज अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पावर आज एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांच्या नक्कलवर भाष्य केलं. 


शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासारख्या देशातील मोठ्या नेत्याने माझी नक्कल केली, हे अनेकांना आवडलेलं नाही. मी त्या सभेत आईचं नाव घेतल्यानंतर थोडं भावनिक झालो होतो. त्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण मी रुमाल काढला नव्हता. त्यांनी रुमाल काढला, डोळे फुसले, असं अजित पवार म्हणाले. तसेच मी शरद पवार साहेबांना दैवत मानलं. मी रात्र-दिवस एक करुन, सगळीकडे जाऊन निवडणुकीत काम केलं आणि आता साहेबांनी मुलासारखा असणाऱ्याची नक्कल केल्यावर मला खूप वेदना झाल्या, अशा भावना अजित पवारांनी व्यक्त केल्या. युगेंद्र पवार किंवा इतरांनी नक्कल केली असती तर चाललं असतं, असं अजित पवार म्हणाले. तसेच इतके दिवस वाटत होतं राज ठाकरेच नक्कल करतात, पण काल साहेब ही दिसले, असा टोलाही अजित पवारांनी लगावला. 


काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार? 


अजित पवारांना काका-पुतण्या एकत्र येणार का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर मी ज्योतिष नाही, राजकारणात काहीही होऊ शकतं असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का? यावर तुम्हाला वाटलं होतं का?, काँग्रेस शिवसेना एकत्र येईल?, असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी विचारला. 


शरद पवार काय म्हणाले होते?


आमच्या काही लोकांनी उद्योग केला आणि शपथ घेतली पहाटे शपथ घेतली राज्यपाल यांना उठवले, कशासाठी?, असा मिश्किल टोलाही शरद पवारांनी अजित पवारांना लगावला. अनेक पद दिली, अनेकांना मंत्री केलं. सुप्रियाला एक पद दिले का? तिनेही कधी मागितले नाही. मी मार्गदर्शन करायची जबाबदारी घेतली आणि नवी पिढ्याच्या हातात अधिकार दिला. सत्ता नाही, म्हणून सहकारी आहेत त्यांची साथ सोडली. कुटुंब एक राहिले पाहिजे ही माझी भूमिका आहे. घर एक ठेवण्याचे काम केलं. चार महिन्यांनी पद मिळाले असते. पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असतं का?, घर मोडणे माझा स्वभाव नाही, असंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. 


पवारांकडून नक्कल, अजितदादा म्हणतात, हे कुणालाही आवडलं नाही...Video:



संबंधित बातमी:


मुलीचा वाढदिवस असताना कोर्टात जायची काय गरज होती, वकील कशाला ठेवलेत? अजितदादांनी सुप्रिया सुळेंना झापलं