पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने महायुतीमधील (Mahayuti) सत्ताधारी पक्ष असलेले भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने आले आहेत. पुणे आणि पिंपरीचिंचवडमहारापालिकानिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे अजित पवारांनी भाजपवर थेट टिका केल्याने भाजपच्या मंत्र्‍यांनीही अजित पवारांना लक्ष्य केलं. तर, मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनीही अजित पवारांना (Ajit pawar) आधी टोला मारला, नंतर थेट टीका केली. त्यामध्ये, अजित पवारांवरील 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा खटला अद्यापही कोर्टात सुरू आहे, असे म्हणत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकप्रकारे इशाराच दिला होता. आता, अजित पवारांनी पुण्यातील (Pune) पुरंदर उपसा सिंचनमधील घोटाळ्याची माहिती दिली. तसेच, मी जर ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता, असेही अजित पवारांनी म्हटले.

महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने अजित पवारांनी 25 वर्षांपूर्वीचा दाखल देत, भाजपवर सिंचन प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन गंभीर आरोप केला आहे. सन 1999 साली राज्यात जेव्हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारुढ झाले तेव्हा माझ्याकडे जलसंपदा खाते आले होते. तेव्हा, पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. मी ती फाईलपाहिली असता, त्यामध्ये या योजनेची रक्कम 310 कोटी रुपये असल्याचं आढळून आलं. मात्र, मी अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी या प्रकल्पाची किंमत आधीच्या सरकारने वाढवल्याचे सांगितले, अशी माहिती अजित पवारांनी दिली. आधीचे सरकार म्हणजे 1995 ते 99 राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. याप्रकरणी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच असल्याचं त्या अधिकाऱ्याने माझ्यापुढे कबुल केलं. तसेच, पुढे त्या अधिकाऱ्याने असंही सांगितलं की, 100 कोटी रुपयेपार्टीफंडासाठी मागण्यात आले होते. मग आम्ही अधिकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आमचे 10 कोटी वाढवले आणि प्रकल्पाची किंमत 310 कोटी झाली. ती फाईलअजुनही माझ्याकडे आहे, जर ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता, असा भ्रष्टाचारा भन्नाट किस्साच अजित पवारांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप करताना सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार?

दरम्यान, विशेष म्हणजे 1999 च्या युती सरकारमध्येभाजपचेदिवंगत नेते महादेवराव शिवणकर हे तत्कालीन जलसंपदा मंत्री होते. त्यामुळे, त्यांच्याच मंत्रि‍पदाच्या काळातील हा किस्सा असल्याचे समजते. आता, या किस्स्यावरुनभाजपकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा

प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड