मुंबई : अजितदादा म्हटलं की समोर येतं ते धारदार आवाज आणि स्पष्टवक्तपणा असलेलं रांगडं व्यक्तिमत्व. समोरच्याचं काम होत असेल तर करणारच आणि होत नसेल तर त्याला नाही म्हणून तोंडावर सांगणारा नेता म्हणजे अजित पवार. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये आता त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्याचसोबत राज्याच्या अर्थखात्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 


Ajit Pawar Profile : अजित अनंतराव पवार यांची राजकीय कारकीर्द कशी आहे?


नाव : अजित अनंतराव पवार


जन्मतारीख: 22 जुलै 1959


जन्मस्थान: देवळाली प्रवरा, राहुरी तालुका, अहमदनगर जिल्हा


शिक्षण: बी.कॉम


ज्ञात भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी


व्यवसाय: शेती


पत्नीचे नाव: पत्नी - सौ.सुनेत्रा अजित पवार


मुले: 2 


मुलगे - पार्थ आणि  जय


बारामती विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त.


सदस्य वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्था, पुणे 


रयत शिक्षण संस्था, सातारा संचालक


महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष – ऑगस्ट 2006 ते 19 ऑगस्ट 2018. 


पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष – सप्टेंबर 2006 पासून 


महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन – मार्च 2013 पासून


सेवादास संचालक : महानंद आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई


महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन - सप्टेंबर 2005 ते मार्च 2013 आणि 25 नोव्हेंबर 2018 पासून अध्यक्ष म्हणून काम करत आहे


पूर्वीच्या विधानसभा / विधानपरिषद / लोकसभा / राज्यसभेचे सदस्य आणि संसद सदस्य / समिती प्रमुख म्हणून केलेले काम (कार्यकाळात)
लोकसभा सदस्य : जून 1991 ते सप्टेंबर 1991


विधानसभा सदस्य : 1991 ते 1995, 1995 ते 1999, 1999 ते 2004, 2004 ते 2009, 2009 ते सप्टेंबर 2014, 2014 ते 26 सप्टेंबर 2019. 2019 ते 2024


राज्य/केंद्रीय मंत्री/राज्यमंत्री म्हणून केलेले काम (कार्यकाळ)


कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री: जून 1991 ते नोव्हेंबर 1992


पाणीपुरवठा, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री: नोव्हेंबर 1992 ते फेब्रुवारी 1993


पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे), फलोत्पादन : ऑक्टोबर 1999 ते जुलै 2004


ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ): जुलै 2004 ते नोव्हेंबर 2004


जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे पाटबंधारे वगळून), जलसंपदा आणि स्वच्छता :  नोव्हेंबर 2004 ते नोव्हेंबर 2009.


जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे वगळून), ऊर्जा : नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010


उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012


उपमुख्यमंत्री (वित्त, नियोजन आणि ऊर्जा): डिसेंबर 2012 ते सप्टेंबर 2014


उपमुख्यमंत्री : 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019


उपमुख्यमंत्री : 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022


विरोधी पक्षनेते : 4 जुलै 2022 ते 30 जून 2023 


उपमुख्यमंत्री : 2 जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024


आणखी वाचा


बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री... घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास