Aheri Assembly Constituency: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली विधानसभा निवडणुकीची धामधूम संपली. निकाल लागला. मात्र त्याचे पडसाद अद्यापही सर्वत्र दिसून येत आहेत. काही ठिकाणी एकात परिवारातील सदस्य निवडणुकीसाठी एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते, काही जिंकले तर काही हरले. मात्र त्यावरून डिवचण्यासाठी पोस्टर आणि टीका केल्या जात असल्याचं चित्र आहे. विदर्भातील अहेरी मतदार संघात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी असा सामना झाला. त्याचबरोबर त्या ठिकाणी वडील आणि मुलगी एकमेकांच्या विरोधात उभे होते. यामध्ये वडीलांचा विजय झाला त्यानंतर आता बाप आखिर बाप होता है अशा स्वरूपाचे बॅनर लागले आहेत. 


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांची आणि त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम शरद पवारांची राष्ट्रवादी  यांच्यात प्रमुख लढत झाली. तर धर्मरावबाबा आत्राम यांचा पुतण्या राजे अंबरीशराव आत्राम हा देखील निवडणुकीच्या रिंगणात होता. अहेरी मतदार संघात कौटुंबिक सामना रंगला होता. या निवडणूकीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे धर्मरावबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांचा विजय झाला. त्यावेळी देखील त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना बाप अखेर बाप असतो अशी  प्रतिक्रीया दिली होती. त्यानंतर आता धर्माबाब आत्राम (Dharmarao Baba Atram) यांच्या विजयानंतर त्यांच्या नागपूरच्या निवास स्थानासमोर 'बाप आखिर बाप होता है' असे होर्डिंग लागले आहेत.


अहेरी विधानसभा मतदार संघात धर्माबाबाबा आत्राम (Dharmarao Baba Atram) यांनी त्यांची कन्या भाग्यश्री यांचा पराभव केला. प्रचारादरम्यान मुलगी व वडिलांमध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यामुळे शेवटी विजयानंतर 'बाप आखिर बाप होता है', हा संदेश धर्मबाबा यांच्या होर्डिंगच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी भाग्यश्री आत्राम यांना दिला आहे. 'बाप आखिर बाप होता है', मंत्री धर्माबाब आत्राम यांच्या विजयानंतर त्यांच्या नागपूरच्या निवास स्थानासमोर लागलेले हे होर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. 


2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अहेरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा अत्राम (Dharmarao Baba Atram) विजयी झाले होते. त्यांना 60 हजार 13 मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे अंबरीशराव राजे अत्राम यांचा पराभव केला होता. आता त्यांना 53978 मते मिळाली. त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना 35569 मते मिळाली. अपक्ष उमेदवार राजे अंबरीश यांनी 37121 मते घेतली. मात्र, धर्मराव बाबा अत्राम  यांच्या विजयानंतर आता मतदारसंघात पोस्टर वॉर दिसून येत आहे.