Sanjay Raut on BJP: मीरा भाईंदरमध्ये भारतीय जनता पक्षाने एमआयएमला पाठिंबा दिला, अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले. अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची एमआयएम बरोबर छुपी युती आहे आणि काही ठिकाणी उघड आहे हा निर्लज्यपणाचा कळस असल्याचा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले की, भाजपला कोणीही चालतो. भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे. कोणीही या अशी स्थिती झाल्याची हल्लाबोल त्यांनी केला. भाजप दुतोंडी गांडूळ असून त्याच पद्धतीने त्यांच राजकारण सुरू असल्याचा घणाघातही त्यांनी केला.
बावनकुळे काय न्यायाधीश झालेत का?
संजय राऊत म्हणाले की, भाजपने ब्लॅकमेल राजकारण चालूच ठेवल सगळ्यांच्या बाबतीत. अजित पवारना ब्लॅकमेल करून तुम्ही राष्ट्रवादी फोडली, एकनाथ शिंदे आणि 40 लोकांना ब्लॅकमेल करून तुम्ही फोडल. अशोक चव्हाणला ब्लॅकमेल करून फोडलं. तुमचा धंदा हा ब्लॅकमेलिंगचा. ती फाईल उघडी आहे, ही फाईल उघडी आहे, बावनकुळे काय न्यायाधीश झालेत का? असा टोला त्यांनी लगावला.
कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासनावर टीका
ते म्हणाले की, देवेंद्र फडणीस राज्य वाऱ्यावर सोडून फिरत आहेत. उपमुख्यमंत्री राज्य वाऱ्यावर सोडून सगळेच फिरत आहेत. महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रचाराला फिरतायत. अजित पवार भाजपला शिव्या देत फिरत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला. भाजपनं कुत्र्याच्या नसबंदीत देखील पैसे खाले आहेत हे त्यांनी राज्याला दाखवून दिलं. याासाठी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. कुत्र्यांच्या नसबंदीतून त्यांनी किती कोटी खाल्ले हे आता आम्ही मनेका गांधींना कळवू, असेही राऊत म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या