कोल्हापूर : जिल्ह्यातील कोल्हापूर उत्तर (Kolhapur North) या मतदासंघात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार मधुरिराराजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी याबात तीव्र नाराजी व्यक्त केली. मधुरिराराजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. 4 ऑक्टोबर रोजी घडलेल्या या अध्यायानंतर आता कोल्हापुरातील राजकारणात घडामोडी वाढल्या आहेत. मधुरिरा राजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयावर महाविकास आघाडीची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 


काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयावर आज (5 नोव्हेंबर) महाविकास आघाडीची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे इतही घटकपक्षातील नेते उपस्थित आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात  घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.  


आजच्या बैठकीला आलं महत्त्व


मधुरिमा राजे यांच्या निर्णयानंतर आता या विधानसभा निवडणुकीला कसे सामोरे जायचे, याबात या बैठकीत विचारमंथन केले जाणार.  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतून  मधुरीमाराजे  छत्रपती यांनी  माघार घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. खुद्द सतेज पाटील यांच्याही डोळ्यांतून काल (4 नोव्हेंबर) अश्रू आले. ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. असं असताना आता महाविकास आघाडीच्या या बैठकीला फार महत्त्व आलं आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. 


सतेज पाटील संतापले


दरम्यान, कोणतीही कल्पना न देताच मधुरिमा राजे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असा दावा सतेज पाटील यांनी केला आहे. तर नाईलाजाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असे स्पष्टीकरण खासदार शाहू महाराज यांनी दिलंय. काँग्रेसच्या या अंतर्गत गोंधळामुळे मित्रपक्षही काही काळासाठी बुचकाळ्यात पडले. मधुरिमा राजे यांच्या निर्णयानंतर सतेज पाटील यांनी संताप व्यक्त केला होता. तुम्हाला माघारच घ्यायची होती, तर मग उभे कशाला राहिले. मिही माझी ताकद दाखवली असती, असे संतापाने सतेज पाटील म्हणाले. त्यांच्या याच विधानाचा आधार घेत शाहू महाराजांचा अवमान झाला आहे, असा दावा भाजपाचे नेते धनंजय महाडिक यांनी केला. 


हेही वाचा :


Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!


मधुरिमाराजेंची माघार, कोल्हापूर उत्तरसाठी आता काँग्रेसचा प्लॅन बी, 'या' अपक्ष उमेदवाराला ताकद पुरवणार!