(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrashekhar Bawankule : एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ भाजप प्रदेशाध्यक्षाचीही पत्रकार परिषद; मुख्यमंत्रीपदावर आज शिक्कामोर्तब?
Chandrashekhar Bawankule: एकनाथ शिंदे यांची पत्रकार होत असताना दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली आहे. आज नागपूर येथे ही पत्रकार परिषद होणार आहे.
Chandrashekhar Bawankule मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. असे असताना निकाल जाहीर होऊन आज चौथा दिवस उजाडला तरीही अद्याप मुख्यमंत्रीपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होताना दिसून येत नाही. त्यामुळे, महायुतीला एवढं बहुमत असतानाही मुख्यमंत्री का ठरत नाही, सरकार का स्थापन होत नाही, असे अनेक सवाल राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांना पडला आहे. त्यातच, मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीतून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.
तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि स्वत: एकनाथ शिंदे हेही मुख्यमंत्रीपदासाठी (Chief minister) आग्रही आहेत. मात्र, महायुतीमध्ये भाजपला मिळालेलं 132 जागांचं संख्याबळ पाहता मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल, हे दिसून येते. त्यातच, आज माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे आभार मानत राज्यात केलेल्या विकासकामांचा आलेख मांडला. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उच्चपदस्थ नेते जो निर्णय घेईल तो माझ्यासह शिवसेनेला मान्य असेल असेही सांगितले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांची पत्रकार होत असताना दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली आहे. आज नागपूर प्रेस क्लब येथे ही पत्रकार परिषद होणार आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेनंतर ही पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष या वेळी काय भाष्य करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
29 नोव्हेंबरला नवीन मुख्यमंत्र्याचा शपथविधी होण्याची शक्यता
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 26 तारखेला होणार अशी चर्चा होती. मात्र 26 तारीख कालच होऊन गेली. आता सत्तास्थापनेचा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनूसार महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी 29 नोव्हेंबरला होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या शपथविधी सोहळ्यात भाजपचे 25 आमदार, तर शिवसेना शिंदे गटाचे 5 ते 7 आमदार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 5 ते 7 शपथ घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी निवडणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. परंतु आता नरेंद्र मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नव्हे, तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार, याचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: