Maharashtra Vidhansabha Election 2024 Aditya Thackeray मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या विद्यमान आमदारांची मुंबईत आज मातोश्री निवासस्थानी बैठक पार पडली. माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यामान आमदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत आदित्य ठाकरेंनी विद्यामान आमदारांना निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. काही दिवसांआधीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे विश्रांती घेत असल्यामुळे आदित्य ठाकरेंनी आज ठाकरे गटाच्या विद्यामान आमदारांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यामान आमदारांना पक्षाकडून उमेदवारीचा शब्द देखील देण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये लवकरच विद्यामान आमदारांना एबी फॉर्म दिले जाणार आहे. 


यादी जाहीर होण्याची वाट बघू नका-


उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या सर्व विद्यमान आमदारांची बैठक पार पडली. उद्धव ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज जरी मिळाला असला तरी विश्रांती घेत असल्याने आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या इतर नेत्यांसोबत विद्यमान आमदारांची बैठक पार पडली. शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना कामाला लागण्याच्या सुचना यामध्ये देण्यात आले. बहुतांश विद्यमान आमदारांना उमेदवारीची खात्री देण्यात आली आहे. यादी जाहीर होण्याची वाट बघू नका, तुमच्याबाबतीत ती सर्व औपचारिकता आहे, असं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. विद्यमान आमदारांसोबत इतरही काही  जणांना मातोश्रीवर आज बैठकीला बोलावलं होतं. त्याचप्रमाणे जे उमेदवारीसाठी इच्छुक होते,  त्यांचीदेखील उमेदवारी निश्चित  मानली जात आहे.


विद्यामान आमदारांसह कोण-कोण उपस्थित होत?


स्नेहल जगताप - महाड मतदारसंघ


सुधाकर बडगुजर - नाशिक पश्चिम


अद्वय हिरे - मालेगाव बाह्य नाव आघाडीवर


नितीन सावंत - कर्जत मतदारसंघ


अनिल कदम - निफाड


मातोश्रीच्या अंगणात वरुण सरदेसाईंना उमेदवारी-


ठाकरे गटाकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून वांद्रे पूर्व मतदारसंघातून युवासेना सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी जाहीर केले आहे. यानंतर वरुण सरदेसाई यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. डबल ग्रॅज्युएट आणि लोकांच्या संपर्कात राहणारा, असं म्हणत वरुण सरदेसाई यांनी प्रचार सुरु केला आहे.  त्यामुळे मातोश्रीच्या अंगणात वरुण सरदेसाई विरुद्ध स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांच्यात लढत होणार असल्याचं जवळपास निश्चित झाले आहे. 


आणखी वाचा:


Maharashtra VidhanSabha Election 2024: शेवट गोड करण्यासाठी सगळ्यांचा अट्टाहास; 'शिवाजी पार्क'वर सभेसाठी एकाच दिवशी 4 पक्षांनी ठोकला शड्डू