Aaditya Thackeray: आपण पाणी मागितले, रस्ते मागितले हे सोडून ते भलते काही बोलतील, कामाचं काही बोलणार नाहीत. हे म्हणतील मेट्रो देतो, यांना सांगा, पाणी द्या मग बाकीचे बोला,  हे लोक फक्त लुटालूट करतात, अशा शब्दात आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला. दाखवण्यासारखं काही नाही, मग जातीय तेढ निर्माण करतात, नोकऱ्या बाबत बोलत नाही, अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली. बदल घडवायचा असेल तर चिन्ह मशाल असल्याचे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी संस्थान गणपतीला नारळ फोडून केला महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ केला. संभाजीनगर शहराचे संस्थान गणपती मंदिर शहराचे ग्रामदैवत आहे. बाळासाहेब ठाकरे देखील संस्थान गणपतीला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करत असत. आदित्य ठाकरे यांनी गुलमंडीमध्ये कारच्या बोनेटवर उभं राहुन भाषण केलं. 

Continues below advertisement

Continues below advertisement

हे सरकार आपल्याला परवडणारं आहे का? 

आदित्य ठाकरे म्हणाले की, हे सरकार आपल्याला परवडणारं आहे का? आपण पाण्यासाठी मोर्चा काढला, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला. पालकमंत्र्यांचे व्हीडिओ येतात, पैसे दिसतात, हे पैसे कुठून येतात? अशी विचारणा त्यांनी केली. ते म्हणाले की, इथल्या खासदाराची कसली दुकान आहेत? बॅगातील पैसा निवडणुकीत बाहेर येतील, हात लावू नका असे त्यांनी सांगितले. युतीवर भाष्य करताना म्हणाले की, मुंबईत आपण एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत.

महायुती सरकारवर हल्लाबोल करताना म्हणाले की, हे लोक फक्त लुटालूट करतात. हे वसुलीबाज, हफ्तेबाज आहेत. ती शिवसेना नाही ती मिंधे चिंधी चोर टोळी आहे. कुणी तरी आपल्यात प्रवेश केला म्हणून टीका करतात, पालघरमधील साधू हत्याकांड बाबत प्रमुख आरोपी भाजपमध्ये का घेतला? ते आधी सांगा,  मग आम्हाला प्रश्न विचारा असं आव्हान त्यांनी दिले. 

इतर महत्वाच्या बातम्या