Assembly Election Results 2026: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाचही राज्यांमध्ये सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला (BJP) घवघवीत यश मिळाले. तर आसामध्येही भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवले. तर केरळमध्ये डाव्यांचा शेवटचा गड पडला असून याठिकाणी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडूमध्ये विजय थलपति याच्या टीव्हीके पक्षाने मुसंडी मारत द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकले. तर पुद्दुचेरीमध्येही भाजपने यश मिळवले आहे. (Vidhansabha Election Result 2026)
पाच राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या या यशामुळे भाजपची देशभरातील ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणखी आक्रमक राजकारणाचे धोरण अवलंबू शकते. या निकालातून आता विरोधक काय धडा घेणार आणि यापुढे कशाप्रकारची रणनीती आखणार, हे पाहावे लागेल.
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप-207तृणमूल काँग्रेस- 80काँग्रेस -02डावे पक्ष- 02इतर-02एकूण जागा-293
Tamilnadu Election Result 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल
द्रमुक- 74अण्णाद्रमुक-53टीव्हीके-107इतर-00एकूण जागा-234
Kerla Election Result 2026: केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल
काँग्रेस यूडीएफ आघाडी-102डावी आघाडी -35इतर-03एकूण जागा-140
Assam Election Result 2026: आसाम विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप-102काँग्रेस- 19इतर-05एकूण जागा-126
Puducherry Election Result 2026: पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीचा निकाल
भाजप- 18काँग्रेस-06इतर-06एकूण जागा-30
Rahuri Bypoll Election 2026: राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय
112587 मतांनी अक्षय कर्डीले विजयी. येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना 27,506 मते मिळाली असून वंचित बहुजन आघाडीच्या संतोष चोळकेंना 5690 मतं पडली आहेत. याशिवाय, अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना 7299 मतं मिळाली असून लाखांच्या फरकाने अक्षय कर्डिले आमदार बनले आहेत.
Baramati byelection Result 2026: सुनेत्रा पवारांना देशात सर्वाधिक मताधिक्य, पोटनिवडणुकीत इतिहास रचला
बारामती पोटनिवडणुकीच्या २४ व्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा विक्रमी विजय झाला आहे. सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. देशात सगळ्यात जास्त मताने निवडून येण्याचा विक्रम सुनेत्रा पवारांच्या नावाने आज झाला आहे.
आणखी वाचा
