2022 Brihanmumbai Municipal Corporation election: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने 'उत्तर भारतीय' कार्ड खेळायला सुरूवात केली आहे.ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एकदिवशीय बिहारचा दौरा करून बिहारमध्ये प्रसिद्ध असणारे नेते तेजस्वी यादव आणि नितीश कुमार यादव यांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आलय , माञ आदित्यचं या भेटीमागे काय आहे “तेजस्वी”  अस्त्र !!  


आधी राहुल गांधी मग तेजस्वी यादव आणि आता अखिलेश यादव.... 


महाराष्ट्रातले युवा ठाकरे सध्या देशांतल्या युवा राजकर्त्यांच्या गाठी भेटी घेत आहेत. आगामी काळातल्या निवडणुका आणि मोदींविरोधातली मोठ बांधण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. विविध भेटींमागे नवनवीन समीकरणं दडली आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री तेजस्वी आणि मुख्यमंत्रीनितीश कुमार यादव यांची भेट घेतली. माञ या भेटीमागं मोठं गणित दडलय हे स्पष्ट आहे. 
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने अनेक उपक्रम राबवत 'उत्तर भारतीय' कार्ड बाहेर काढलेय. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अदित्य यांची यादव यांची भेट घेत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महत्त्वाचे पाऊल पुढे टाकल्याची जोरदार चर्चा आहे.


 
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उत्तर भारतीय मतांसाठी उत्तर प्रदेशातले अनेक नेते प्रचारात आणले जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गट बिहारच्या नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांना आपल्याकडे वळवण्याच्या प्रयत्न दिसून येतो आहे.शिवसेनेमध्ये पडलेली फूट आणि सत्तातरानंतर आमदार आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच बिहारचा दौरा करुन आले आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे राजकीय नजरेने पाहिले जात आहेत. या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांचे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केलं आहे. मुंबईत अनेक जाती धर्माच लोक राहतात. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना आपलसं करण्याचा प्रयन्त सुरु आहे. 


मुंबईत 31 टक्के मराठी मतं आहेत. 


मुंबईत 26 टक्के उत्तर भारतीय मतदार


13 टक्के गुजराती मतदार


13 टक्के मुस्लिम मतदार आहेत


14 टक्के दलित मतदार आहेत. त्यापैकी 9 टक्के बौद्ध आहेत. 


विशेषतः बौद्ध समाज हा मुंबईत प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले आणि काही कांग्रेस सोबत विभागला आहे. त्याला सोबत घेण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहे. मुंबई महापालिकेच्या मागील तीन निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला किती मुंबईतून मतदान झालं....


2007 मुंबई महापालिका निवडणूक
भाजप 8.86% मतदान 
शिवसेना 22.15 टक्के मतदान 
काँग्रेस 27.58% मतदान 
राष्ट्रवादी 11.22 टक्के मतदान 
मनसे 11.78 टक्के मतदान


2012 मुंबई महापालिका निवडणूक मतदान
भाजप 8.7% मतदान
शिवसेना 20.81% मतदान 
काँग्रेस 19.89% मतदान 
राष्ट्रवादी 7.28 टक्के मतदान 
मनसे 20.62 टक्के मतदान


2017 मुंबई महानगरपालिका मतदान 
भाजप 27.48% मतदान 
शिवसेना 28.34% मतदान 
काँग्रेस 15.97% मतदान 
राष्ट्रवादी 4.85% मतदान 
मनसे 7.97% मतदान


आदित्य ठाकरे यांनी ही राजकीय भेट नसली असं सांगितले असले तरी, या भेटीत तेजस्वी यादव यांना मुंबईत येण्याचं आमंत्रणही देण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी भाजपकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आणले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचपार्श्वभूमीवर ठाकरे गटही आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तेजस्वी यादव आणि अखिलेश यादव यांना मुंबईत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.