मुंबई : महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने (Uddhav Thackeray) उमेदवार यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. शिवेसना ठाकरे गटाकडून पहिल्या 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, मुंबईतून 13 जणांना उमेदवारी देण्यात आली असून आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून तर वरुण सरदेसाई यांना आमदार झिशान सिद्दीकी यांच्याविरुद्ध मैदानात उतरवण्यात आले आहे. तर, मंत्री तानाजी सावंत (Tanaji sawant) यांच्याविरुद्ध ठाकरेंनी निष्ठेचं कार्ड खेळलं आहे. या मतदारसंघातून नुकतेच निधन झालेल्या शिवसेनेच्या निष्ठावंत माजी आमदाराच्या मुलाला संधी देण्यात आली आहे. भूम-परंडा-वाशी मतदारसंघातून राहुल ज्ञानेश्वर पाटील यांना ठाकरेंनी निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं आहे. ठाकरेंच्या पहिल्या यादीतील 10 वैशिष्टे जाणून घेऊयात.
शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील महत्त्वाचे मुद्दे
1. शिवसेना ठाकरे गटाने 65 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे
2. पहिल्या यादीमध्ये 15 पैकी 14 विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाकडून संधी देण्यात आली आहे
3. शिवडी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर अजूनही सस्पेन्स कायम आहे.. अजय चौधरी की सुधीर साळवी ? याचा निर्णय दुसऱ्या यादीमध्ये घेतला जाईल
4. कोपरी पाच पाखडी या विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे विरोधात केदार दिघे यांना उमेदवारी
5. ज्या जागांवर तिढा होता अशा जागा
रामटेक- विशाल बरबटे यांना उमेदवारी
नांदगाव गणेश धात्रक यांना उमेदवारी
सोलापूर दक्षिण अमर पाटील यांना उमेदवारी
सावंतवाडी राजन तेली यांना उमेदवारी
वांद्रे पूर्व वरूण सरदेसाई यांना उमेदवारी
कर्जत नितीन सावंत यांना उमेदवारी
6. अनेक नव्या चेहऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाने संधी दिली आहे
वरूण सरदेसाई
महेश सावंत
प्रवीणा मोरजकर
केदार दिघे
स्नेहल जगताप
समीर देसाई
सिद्धार्थ खरात
राजू शिंदे
या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे
7. तानाजी सावंत यांच्याविरुद्ध निष्ठेचं कार्ड - परांडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते. त्यांच्या विरोधात पराभूत झालेले उमेदवार राहुल मोटे हे उमेदवारीच्या शर्यतीत होते. मात्र तीन टर्म आमदार राहिलेल्या राहुल मोठेंचा यावेळेस पत्ता कट झाला. उद्धव ठाकरेंचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलाला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. वडिलांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंनी रणजीत पाटलांना वाऱ्यावर सोडलं नाही. राहुल मोठ्यांचा पत्ता कट करत शिवसेनेच्या रणजीत पाटलांना तानाजी सावंत यांच्या विरोधात मैदानात उतरवला आहे.
8. मुंबईतील 13 जागांवर उमेदवारांची घोषणा
9. मराठवाड्यातील 7 मतदारसंघात उमेदवार, शिंदेंच्या आमदार संजय शिरसाटांविरुद्ध राजू शिंदे यांना उमेदवारी
10. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरुद्ध दिवंगत आनंद दिघेंचे पुतणे केंदार दिघेंना संधी
हेही वाचा
मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर, ठाकरेंचे 65 उमेदवार रणांगणात!