Mumbai News : पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात या मागणीसाठी आज मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांच्या दालनात युवासेनेनं ठिय्या आंदोलन केलं आहे.  कोरोना काळानंतर मुंबई विद्यापीठाच्या प्रथमच होणाऱ्या तृतीय वर्ष पाचव्या सत्राच्या परीक्षा 13 ऑक्टोबर पासून जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, या परीक्षा किमान एक महिना पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी युवासेनेकडून होत आहे. यासाठी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा भवन येथे संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ यांना जाब विचारण्यासाठी युवासेना सिनेट सदस्य पोहचले. यावेळी युवा सेनेच्या सदस्यांनी पदवीच्या परीक्षा किमान एक महिना तरी पुढे ठलण्यात यावी अशी मागणी केली. 


निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार


जोपर्यंत परीक्षा पुढे ढकलल्या जात नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असा पवित्रा युवासेनेने घेतला आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर जुलैपासून कॉलेजचे वर्ग सुरू झाले आहेत. किमान 90 दिवस तरी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवले गेले पाहिजे असा नियम आहे. मात्र, या आधीच परीक्षेचे नियोजन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे याला आक्षेप घेत पदवीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी युवा सेनेने लावून धरली आहे. 


परीक्षा होणार असतील तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसून तयारी नसताना विद्यापीठ परीक्षा घेत असल्याने विद्यार्थ्यांनी या संदर्भात तक्रार करून सुद्धा कुठलाही निर्णय होत नसल्याने विद्यार्थ्यांसोबत युवासेनेने हे पाऊल उचललं आहे. या आंदोलनात युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसाना होऊ नये यासाठी या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी युवा सेनेच्या वतीने विद्यापीठाकडे करण्यात आली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाही अशी, भूमिका यावेळी विद्यार्थी आणि युवा सेनेकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे या आंदोलनानंतर विद्यापीठ काय निर्णय घेतंय याकडे आता विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI