World Record : इच्छाशक्ती आणि चिकाटी असेल तर कोणी काहीही करू शकतो. अनेक जण विविध क्षेत्रात आपली ओळख बनवण्याचा प्रयत्न करतात. त्यात यश यावे म्हणून शक्य तेवढे प्रयत्न करतात. या प्रयत्नांना यश येणार नाही तोपर्यंत ते हार मानत नाहीत. अशीच काहीशी गोष्ट आहे सोनीपतच्या मार्टिनची. वय हा फक्त एक आकडा आहे हे या मुलाने सिद्ध केले आहे. मार्टिन नावाचा हा मुलगा 10 वर्षांचाही नाही आणि त्याने  विश्वविक्रम केला आहे. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाकडून आपण काय अपेक्षा करू शकता? तो चांगला अभ्यास करतो का? पण, मार्टिनने यापेक्षाही अधिक केले आहे. मार्टिन याने अगदी लहान वयात आपल्या नावावर तब्बल 8 विश्वविक्रम (World Record) केले आहेत. त्याचे वय केवळ  8  वर्ष आहे. त्याच्या या विक्रमाने अनेक लोक हैराण झाले आहेत.


जेवढे वय तेवढे विश्वविक्रम केले आपल्या नावावर


सोनीपत के सेक्टर 23 मध्ये राहणारा मार्टिनने केवळ वयाच्या  8 व्या वर्षी अद्भूत पराक्रम केला आहे. मार्टिनच्या या अनोख्या विश्वविक्रम पाहून मोठ-मोठे लोक हैराण झाले आहेत.मोठे लोक जे करू शकत नाहीत ते या लहान मुलाने करून दाखवले आहे. मार्टिनने आजवर 8 विश्वविक्रम आणि आशिया रेकाॅर्ड आपल्या नावावर केला आहे. इतक्या कमी वयात आणि अगदी कमी मिनीटात एवढ्या संख्येने पंच करणारा हा एकमेव मुलगा आहे. 


लाॅकडाऊनमध्ये शिकला किकबाॅक्सिंग


लाॅकडाऊन (Lockdown) हे अनेक लोकांसाठी वरदान बनले होते. लाॅकडाऊनमध्ये खूप लोक बऱ्याच कलाकुसर शिकले. काहींना आपले करिअर (Carrier) उत्तम पद्धतीने सेट केले. अगदी याच प्रकारे मार्टिनने ही लाॅकडाऊनचा पुरेपुर फायदा घेतला. त्याने घरीच वडिलांच्या मदतीने किकबाॅक्सिंग (Kickboxing) शिकायला सुरूवात केली. यासाठी लागणारा योग्य आहार आणि स्किल्स याची व्यवस्थितरित्या सांगड घालून त्याने हे यश मिळवले आहे. रोज रात्रंदिवस एक करून त्याने सतत याची प्रॅक्टिस (Practice) केली.मार्टिनने हा विश्वविक्रम (World Record) केल्यानंतर लंडनमध्ये त्याचा सन्मान करण्यात आला. मार्टिनच्या आधी पंचिंग बेडवर 3 मिनिटांत 918 पंच मारण्याचा विश्वविक्रम रशियाच्या 28 वर्षीय पावेलच्या नावावर होता, मात्र वयाच्या 8 व्या वर्षी मार्टिनने 3 मिनिटांत 1105 पंच मारून हा विक्रम केला आहे.


 


इतर महत्वाच्या बातम्या


Viral News: दहावीत एका विद्यार्थाला मिळाले चक्क 35 टक्के,पालकांचा आनंद गगनात मावेना


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI