HSC Exams : बारावीच्या परीक्षा (HSC Exam) घेणार पण संप काळात बारावी बोर्ड परीक्षा उत्तरपत्रिका (12th Board Exam Answer Sheet) तपासणार नाही, अशी भूमिका राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेने (State Junior College Teachers Association) घेतली आहे. दरम्यान, जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर संकटाचे काळे ढग जमा झाले आहेत. या संप काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा शिक्षक संघटनांनी पवित्रा घेतला आहे. 


महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्या कार्यकारिणीने काल (13 मार्च) झालेल्या बैठकीमध्ये बारावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थीहित तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक बिघडू नये, विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा तयारी करावी लागू नये म्हणून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. 


केवळ बारावीच्या परीक्षाविषयक काम करणार : शिक्षक संघटना


बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी तसेच अकरावीच्या परीक्षा, मूल्यमापन, अध्यापन करणार नसल्याची भूमिका स्पष्ट करत जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या 14 मार्चपासून सुरु होणाऱ्या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे शिक्षक केवळ बारावीच्या परीक्षा विषयक कार्य करतील आणि इतर कोणतेही कार्य करणार नाहीत. महाविद्यालयाची कोणतीही कामं करणार नाहीत, हे महासंघाने स्पष्ट केलं आहे.


जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्माचाऱ्यांचा बेमुदत संप


दरम्यान, जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी येत्या 14 मार्चपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. राज्यातील अनेक शिक्षक संघटना या संपात सहभागी होणार असल्याने माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनीही सामील होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या शिक्षक संघटनांनी जाहीर केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक संघटनांच्या संपाचा फटका दहावी, बारावीच्या परीक्षा आणि निकालांना बसणार आहे. 


संपात सहभागी शिक्षक संघटना


राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ, मुंबई आणि उपनगर माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती, महाराष्ट्र शिक्षक सेना, ग्रेटर मुंबई शिक्षक संघटना, शिक्षक परिषद, राज्य खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघ या संघटना संपात सहभागी झाल्या आहेत 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI