Steering Wheel In Train: लोकांच्या मनात रेल्वे (Railway) संबंधित अनेक कुतूहल आहेत. काही वेगळं पाहिल्याबरोबर लगेच त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता मनात जागृत होते. तुम्ही कधी ट्रेनच्या इंजिनच्या आत डोकावून पाहिलं असेल, तर तिथे तुम्हाला स्टेअरिंग व्हीलही दिसलं असेल. आता हे स्टेअरिंग व्हील (Steering Wheel) पाहिल्यानंतर बहुसंख्य लोकांना वाटलं असेल की ट्रेन वळवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पण तसं नाही, ट्रेन वळवण्याचं काम रुळांसाठीच्या स्विचने केलं जातं, इंजिनमधील या छोट्या स्टेअरिंग व्हीलने नाही. आता प्रश्न असा पडतो की, या स्टेअरिंग व्हीलमुळे गाडी वळत नाही, तर त्याचे काम काय?


ट्रेनचा वेग वाढतो कसा?


लोकोमोटिव्हमध्ये बसवलेले हे छोटे स्टेअरिंग व्हील (Steering Wheel) ट्रेनचा वेग वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वापरले जाते. या स्टेअरिंग अंतर्गत भागात उपकरण देखील आहे. हे उपकरण ट्रेनच्या गिअरप्रमाणे काम करते. आजकाल सर्व रेल्वे गाड्या इलेक्ट्रिक झाल्या आहेत. रेल्वेत त्यांची गती व्होल्टेजवर अवलंबून असते. व्होल्टेज वाढले की ट्रेनचा वेगही वाढतो. जेव्हा हे चाक (स्टेअरिंग व्हील) उजवीकडे फिरवले जाते तेव्हा व्होल्टेज वाढते आणि डावीकडे फिरवले जाते तेव्हा व्होल्टेज कमी होते, म्हणजेच ट्रेनचा वेग कमी होतो. रेल्वेच्या भाषेत या प्रक्रियेला टॅपिंग म्हणतात.


काळानुसार हे स्टेअरिंग व्हील होत आहेत बंद


पाहायला गेले तर, आता हे स्टेअरिंग व्हील (Steering Wheel) हळूहळू ट्रेनमध्ये बंद केली जात आहेत. केवळ जुन्या ट्रेनमध्येच आता हे स्टेअरिंग व्हील (Steering Wheel) पाहायला मिळते. वास्तविक आता या चाकाऐवजी इंजिनमध्ये लीव्हर बसवले जात आहेत. हे लीव्हर अगदी विमानाच्या कॉकपिटमध्ये असलेल्या लीव्हरप्रमाणेच आहे. तुम्ही विमानाच्या कॉकपिटमध्ये लीव्हर पाहिले असेल, ज्याद्वारे विमानाचा वेग वाढवला जातो आणि कमी केला जातो आणि विमानाचे टेक-ऑफ (Take-off) देखील केले जाते. त्यामुळे, स्टेअरिंग व्हील हे आता प्रामुख्याने WAG, WAM आणि WAP सारख्या जुन्या लोकोमोटिव्ह इंजिनमध्येच दिसते.




ट्रेन कशी वळवली जाते?


ट्रेनच्या इंजिनमध्ये पटरी बदलण्यासाठी एक डावा स्विच (Left Switch) आणि एक उजवा स्विच (Right Switch) असतो. डावा स्विच चालू केल्यास ट्रेन डावीकडे जाते, तर उजवा स्विच चालू केल्यास ट्रेन उजवीकडे जाते. एक स्विच चालू असल्यास दुसरा स्विच बंद असतो. या स्विचचा वापर करुन ट्रेन एका रुळावरुन दुसर्‍या रुळावर नेली जाते (Train Track Change) किंवा एका मार्गावरून दुसर्‍या मार्गावर वळवली जाते.


ट्रेनची चाके आतून रुळांना धरून ठेवतात. ट्रेनच्या चाकांच्या खास डिझाईनमुळे ती रुळावरून घसरत नाही आणि जो स्विच सुरू केला जातो, त्या दिशेच्या रुळावरुन ट्रेन चालते.


हेही वाचा:


Maharashtra Politics : सत्तासंघर्षावर प्रश्न विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...मी तुम्हाला हात जोडतो.... 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI