Washim HSC Exam Mass Copying Case : वाशिमच्या टो येथील मैनागिरी विद्यालयात बारावीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचे प्रकार समोरआलाआहे. याप्रकरणी शिक्षण विभागाकडून तब्बल 581 विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई करण्यातआलीआहे. भौतिकशास्त्र विषयाच्या पेपर दरम्यान विद्यार्थ्यांकडून हा सामूहिक कॉपीचा (Board Exam Copy) प्रकारघडलाय. प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांच्या भरारी पथकाने अचानक धाड टाकत ही मोठी कारवाई केली आहे. (Washim HSC Exam 2026)
HSC Exam 2026 : केंद्र संचालकासह 50 हून अधिक कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याचे संकेत
दरम्यान, आतापर्यंतची जिल्ह्यातील हि सर्वात मोठी कारवाई असल्याचंबोललंजातआहे. तर शिक्षण विभागाने कारवाई संदर्भातील अहवाल वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवलाआहे. त्यामुळेआतयाप्रकरणी केंद्र संचालक, सहाय्यक केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांसह 50 हून अधिक कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याचे संकेत आहे.
Washim News : वाशिम जिल्ह्यातील कॉपी प्रकरणात दोषी शिक्षक कारवाईच्या रडारवर (Washim HSC Exam 2026)
वाशिम जिल्ह्यात बोर्डच्या बारावी परीक्षेत कॉपी प्रकार घडल्याच्या सातत्याने घटना समोर आल्याआहेत. कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्यानंतर आता थेट शिक्षकच कारवाईच्या रडारवर आले आहेत. वाशिम जिल्ह्यात विविध परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांकडून कॉपी होत असल्याचे प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासनाने जबाबदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केलीय. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी अमरावती येथील उपशिक्षण संचालकांना पत्र पाठवत 5 केंद्र संचालक, 2 सहायक केंद्र संचालक आणि 14 पर्यवेक्षक अशा एकूण 21 कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली आहे. बारावीच्या इंग्रजीच्या पहिल्या पेपरपासून कॉपी मुक्त अभियान अंतर्गत भरारी पथकांनी धाडी टाकताच अनेक केंद्रांवरील कारवाई केल्याने परीक्षा व्यवस्थापनातील त्रुटी स्पष्ट झाल्या आहत.
वाशिम जिल्ह्यातील कॉपी प्रकरणे उघडकीस आलेली केंद्रे
मानोरा तालुका – रुई
वाघामय देवी आदिवासी ज्युनिअर कॉलेज – १७ विद्यार्थी पकडले
शेंदुरजना आढाव
अप्पास्वामी ज्युनिअर कॉलेज – २ विद्यार्थी
किन्हिराजा
वसंतराव नाईक ज्युनिअर कॉलेज – १ विद्यार्थी
रिसोड तालुका – मांडवा
ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज – २१ विद्यार्थी
बाबासाहेब धाबेकर ज्युनिअर कॉलेज – ३ विद्यार्थी
विद्यार्थ्यांवर कारवाईसोबतच परीक्षा केंद्र प्रमुख आणि पर्यवेक्षकांच्या भूमिकेवरही प्रशासनाने बोट ठेवलं आहे.
आगामी पेपरमध्ये आणखी कडक तपासणी होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
Beed News: पेपरचे चिट दगडात गुंडाळून विद्यार्थ्यांना कॉपीचा पुरवठा; गेवराईतील पाडळशिंगी परीक्षा केंद्रावरील प्रकार समोर
बीडच्या गेवराईतील पाडळसिंगी परीक्षा केंद्रावर सुरू असलेल्या कॉपी पुरवठ्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतोय. यंदाच्या बारावी परीक्षा कॉपी मुक्त व्हाव्या याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पावलं उचलली. परंतु पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाला हरताळ फासण्यात आले. गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी येथे एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना नातेवाईकांकडून कॉपी पुरवण्याचा व्हिडिओ समोर आला. पेपरचे चीट एका दगडात गुंडाळून खिडकीद्वारे फेकण्याचा प्रकार यातून दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच कॉपी पुरवठा प्रकरणात 17 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र तरी देखील बीडच्या ग्रामीण भागात हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI