Three Language Formula Maharashtra: 15 जूनपासून सुरु होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी (Three Language Formula Maharashtra) करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शालेय शिक्षण विभागाकडून इयत्ता तिसरी ते आठवीसाठी विषय योजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तालिका विभागणी व शालेय वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

Continues below advertisement

त्रिभाषा धोरण अंमलबजावणीबाबत समितीच्या शिफारशी व त्यावरील होणाऱ्या शासनाचे निर्णयास अनुसरुन तिसऱ्या भाषेबाबत निर्णय होईपर्यंत प्रचलित अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकांचा उपयोग करण्यात येणार,असा निर्णय राज्यस्तरीय सुकाणू समिती बैठकीत घेण्यात आला आहे. प्रचलित पद्धतीनुसार तिसरी भाषा बाबत विद्यमान धोरण कायम असल्याने इ.5वीपासून पुढील वर्गासाठी यापूर्वी लागू असलेली तिसरी भाषा पद्धती नवीन धोरण व नवीन अभ्यासक्रम लागू होईपर्यंत तशीच लागू राहील. पूर्वीचा कार्यानुभव हा विषय यापुढे कार्यशिक्षण या नावाने ओळखला जाईल. (Three Language Formula Maharashtra)

इयत्ता तिसरी ते पाचवी मराठी माध्यमांच्या शाळांसाठी विषय योजना खालील प्रमाणे राहील- (Three Language Formula Maharashtra)

1. मराठी प्रथम भाषा 2. इंग्रजी द्वितीय भाषा 3. गणित4. ( प्रचलित पद्धतीनुसार भाषा विषय )4. आपल्या सभोवतालचे जग भाग 15. आपल्या सभोवतालचे जग भाग 2 6. कलाशिक्षण 7. शारीरिक शिक्षण व निरामयता 8. कार्यशिक्षण

Continues below advertisement

इयत्ता तिसरी ते पाचवी इंग्रजी माध्यमांच्या  शाळांसाठी विषय योजना खालील प्रमाणे राहील (Three Language Formula Maharashtra)

1. इंग्रजी प्रथम भाषा 2. मराठी द्वितीय भाषा 3. गणित4. ( प्रचलित पद्धतीने नुसार भाषा विषय )4. आपल्या सभोवतालचे जग भाग 15. आपल्या सभोवतालचे जग भाग 2 6. कलाशिक्षण 7. शारीरिक शिक्षण व निरामयता 8. कार्यशिक्षण

इयत्ता सहावी ते आठवी मराठी माध्यमांच्या  शाळांसाठी विषय योजना खालील प्रमाणे राहील (Three Language Formula Maharashtra)

1. मराठी प्रथम भाषा 2. इंग्रजी द्वितीय भाषा 3. प्रचलित पद्धतीनुसार भाषा विषय 4. गणित 5. विज्ञान 6. सामाजिक शास्त्र 7. कलाशिक्षण 8. शारीरिक शिक्षण व निरामयता 9. कार्यशिक्षण

इयत्ता सहावी ते आठवी इंग्रजी माध्यमांच्या  शाळांसाठी विषय योजना खालील प्रमाणे राहील (Three Language Formula Maharashtra)

1. इंग्रजी प्रथम भाषा 2. मराठी द्वितीय भाषा 3. प्रचलित पद्धतीनुसार भाषा विषय 4. गणित 5. विज्ञान 6. सामाजिक शास्त्र 7. कलाशिक्षण 8. शारीरिक शिक्षण व निरामयता 9. कार्यशिक्षण

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यावर शालेय शिक्षण विभाग ठाम, वेळापत्रक जाहीर; पाठ्यपुस्तके, शिक्षक नाहीत तर मग वेळापत्रकाची घाई का? 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI