CET Exams : शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी घेण्यात घेणाऱ्या 'सीईटी' परीक्षांचं (Maharashtra CET Exams) तात्पुरते वेळापत्रक (Maharashtra CET Timetable) जाहीर करण्यात आलं आहे. तात्पुरत्या वेळापत्रकानुसार, यंदा 18 मार्च ते 23 जुलै या कालावधीत 'सीईटी' परीक्षा (CET Exams Timetable) होण्याची शक्यता आहे.
शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी घेण्यात घेणाऱ्या सीईटी परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. तात्पुरत्या वेळापत्रकानुसार, यंदा 18 मार्च ते 23 जुलै या कालावधीत 'सीईटी' परीक्षा होण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकीसाठी एमएच-सीईटी परीक्षा 9 ते 20 मे दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे.
अभियांत्रिकी, कृषी, बी. फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेत पीसीएम ग्रुपमधील परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान, तर पीसीबी ग्रुपसाठी 15 ते 20 मे दरम्यान होणार आहे. तर विधी अभ्यासक्रमात एलएलबीसाठी 1 एप्रिलला, तर एलएलबी यासाठी 2 आणि 3 मे रोजी परीक्षा होणार आहे.
MHT CET परीक्षेचं तात्पुरतं वेळापत्रक
- PCM परीक्षा : 9 ते 13 मे दरम्यान
- PCB परीक्षा : 15 ते 10 मे दरम्यान
CET परीक्षा
MBA/MMS : परीक्षा 18 मार्च ते 19 मार्च 2023 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
MAH LLB 5 Years : 1 एप्रिल 2023
MAH LLB 3 Years : 2 मे आणि 3 मे 2023
B.A/B.Sc. B. Ed. (चार वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स) : 2 एप्रिल 2023
दरम्यान, जेईई, नीट, सीयुईटी, यूजीसी नेट या परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झालं आहे. या परीक्षांसह महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा कालावधी लक्षात घेऊन सीईटी सेलनं परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
NEET PG 2023 परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; अशी करा नोंदणी
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI