SSC Exam Nagpur Success Story : ऐकण्याची शक्ती 100% नसेल, तरी एक विद्यार्थिनी सामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत सामान्य विद्यार्थ्यांसोबत शिकून दहावीच्या परीक्षेत (SSC Exam) तब्बल 94.2% गुण मिळवत असेल तर? नागपूरच्या (Nagpur) शांभवी पंचबुद्धे या विद्यार्थींनेनंअसच घवघवीत (SSC Exam Result 2026) यश मिळवून दाखवले आहे. शांभवी पाचव्या वर्गात असताना तिला मोठ्या प्रमाणावर कफ झाला आणि हळूहळू तिची ऐकण्याची शक्ती कमी होत गेली. दरम्यान, ती सातव्या वर्गात पोहोचेपर्यंत ऐकण्याची शक्ती पूर्णपणे नाहीशी झाली. मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिला सामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेतच ठेवण्याचा निर्णय घेतला. यानिर्णयात सोमलवार शाळेने सुद्धा साथ दिली. शांभवीला ऐकू येत नाही म्हणून फक्त तिला पहिल्या बाकावर बसण्याची सूट देण्यात आली. शिक्षकांनी शिकवताना केलेला लीप मुव्हमेंट ती आत्मसात करायची आणि शिक्षक इतर विद्यार्थ्यांना काय सांगत आहे, हे लीप रीडिंगच्या माध्यमातून समजून घ्यायची. (SSC Exam Nagpur Success Story)

दरम्यान, ऐकण्यासंदर्भातल्या व्याधीमुळे बोर्डाच्या नियमाप्रमाणे शांभवीला राईटर मिळू शकत होता, मात्र शांभवी ने स्वतःच पेपर लिहिण्याचा निर्णय घेतला आणि दहावीच्या परीक्षेत 94.2% टक्केगुण मिळवत घवघवीत यश मिळवले आहे.

SSC Exam Nagpur: आईच्या गर्भापासून सुरू झालेला सोबतचा प्रवास, जुळ्या भावंडांनी दहावीच्या परीक्षेतही साधला

जन्मापासून प्रत्येक गोष्टीत सोबत राहणारे, वावरणारे जुळे भावंड, जर दहावीच्या परीक्षेतही अगदी सारखे गुण घेत असेल, तर तुम्ही काय म्हणणार? नागपूरच्या खिलज आणि खुशी चांदेवार या जुळ्या भाऊ-बहिणींनी दहावीच्या परीक्षेत 97.8% असे सारखे गुण घेऊन एक वेगळाच योगायोग साधला आहे.

SSC Exam Results : जुळ्या भाऊ-बहिणींना दहावीच्या परीक्षेत 97.8% असे सारखेच गुण

बहिणीने भावाला सोशल स्टडीजमध्ये मागे टाकले, तर भावाने सुद्धा गणितात बहिणीपेक्षा जास्त गुण घेतले. मात्र दोघांचे एकूण गुण सारखेच राहिले. कधी भांडण, कधी सहकार्य असा शैक्षणिक प्रवास करत दोघांनी एकमेकांचे नोट्स वापरले. एकमेकांची मदत घेतली आणि दहावीत सारखे गुण मिळवत वेगळाच योगायोग साधला आहे.

SSC Exam Result 2026:  दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींची बाजी

मुलींची टक्केवारी ९४.९६ टक्के

मुलांची टक्केवारी: ९०.५६ टक्के

मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर मुलांची ९०.५६ टक्केवारी

SSC Exam Result 2026: विभागनिहाय आकडेवारी समोर

कोकण: ९७.६२ टक्के

पुणे: ९४.२४ टक्के

नागपूर: ८९.०७ टक्के

मुंबई: ९४.९७ टक्के

कोल्हापूर: ९५.४७ टक्के

अमरावती: ९०.५० टक्के

नाशिक: ९०.५३ टक्के

लातूर: ८८.४२ टक्के

छत्रपती संभाजीनगर: ८८.४१ टक्के

एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी: १५ लाख ५५ हजार ०२६ 

उत्तीर्ण विद्यार्थी: १४ लाख २० हजार ४८६

इतर महत्वाच्या बातम्या  


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI