एक्स्प्लोर

SSC Result 2026 Marathi: मोठी बातमी: दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास

SSC Result 2026 Marathi: दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. मुंबई विभागाच्या निकालात मोठी घसरण. कोकण विभाग अव्वल. मुंबईत चार हजार विद्यार्थी नापास

SSC Result 2026 Marathi: राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या विषयावरुन वादंग माजला असताना आता महाराष्ट्रात मराठी भाषेची (Marathi Language) परिस्थिती फारशी सुखावह नसल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC Exam Result 2026) ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत 92 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, महाराष्ट्राच्यादृष्टीने चिंताजनक बाब म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी विषय निवडणाऱ्यांपैकी तब्बल 80 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत.या परीक्षेत 35 विषयांपैकी 12 विषयांचा निकाल 100 टक्के लागला. मात्र, त्याचवेळी प्रथम भाषा मराठी असणाऱ्या 10 लाख 87 हजार 699 विद्यार्थ्यांपैकी 80 हजार 803 विद्यार्थी म्हणजे जवळपास 7 टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. तसेच द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठीची निवड करणाऱ्या 4 लाख 13 हजार 917 विद्यार्थ्यांपैकी 13 हजार 741 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. आगामी काळात ही मराठी भाषेच्यादृष्टीने चिंतेची बाब मानली जात आहे. (Maharashtra Board Dahavicha Nikal)

शिक्षणतज्ज्ञांच्या मते शुद्धलेखनातील चुका आणि वाचनाचा अभाव यामुळे मराठी भाषेतील अनुत्तीर्णांची संख्या वाढली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची आवड आणि शिकवण्याच्या पद्धतीत बदल करावा. तसेच मराठी विषय दहावीपर्यंत अनिवार्य  असलेल्या कायद्यात सुधारणा करुन मराठी बारावीपर्यंत अनिवार्य करण्याची गरज शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली.

यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 92.09 टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक (Konkan Division Recorded Highest Result) लागला असून 97.62 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,55,026 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,42,472 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची एकूण उत्त्तीर्णतेची टक्केवारी 92.09 आहे. 

Maharashtra Board SSC Result 2026: गुजराती भाषेत 100 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, अरेबिक भाषेतही 99 टक्के विद्यार्थी पास

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून गुजराती भाषेची निवड करणाऱ्या 302 विद्यार्थ्यांपैकी सर्व म्हणजे 100 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर संस्कृत ही द्वितीय किंवा तृतीय भाषा निवडणाऱ्या 96 हजार 331 विद्यार्थ्यांपैकी 95 हजार 571 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर अरेबिक भाषेचा निकाल 99.59 टक्के लागला आहे. 

आणखी वाचा

ऐकण्याची शक्ती शून्य, मात्र लीप रीडिंगच्या जोरावर दहावीत नागपूरच्या शांभवीचं घवघवीत यश, तर जुळ्या भावंडांचा सारखे गुण मिळवत परीक्षेतही 'सेम टू सेम'

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Three Language Formula Maharashtra: यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी नाही; शालेय शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवीसाठी वेळापत्रक जाहीर
यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी नाही; शालेय शिक्षण विभागाकडून पहिली ते आठवीसाठी वेळापत्रक जाहीर
NEET Re-Exam Update: मोठी बातमी: आता 180 ऐवजी 195 मिनिटांचा पेपर; 21 जूनच्या परीक्षेसाठी 'NTA'कडून वाढवला वेळ, रफ कामाची पानेही वाढवली
मोठी बातमी: आता 180 ऐवजी 195 मिनिटांचा पेपर; 21 जूनच्या परीक्षेसाठी 'NTA'कडून वाढवला वेळ, रफ कामाची पानेही वाढवली
Abhijeet Dipke CJP: भाजपकडून कॉकरोच पार्टीचे फॉलोअर्स पाकिस्तानी असल्याचा आरोप, अभिजीत दिपकेंनी एकाच वाक्यात प्रत्युत्तर दिलं, म्हणाले...
भाजपकडून कॉकरोच पार्टीचे फॉलोअर्स पाकिस्तानी असल्याचा आरोप, अभिजीत दिपकेंनी एकाच वाक्यात प्रत्युत्तर दिलं, म्हणाले...
Sanjay Raut on Abhijit Dipke : पंतप्रधान मोदी आणि अभिजीत दीपकेंची अमेरिकेत भेट झाल्याचा दावा, संजय राऊतांनी फोटोच दाखवला
पंतप्रधान मोदी आणि अभिजीत दीपकेंची अमेरिकेत भेट झाल्याचा दावा, संजय राऊतांनी फोटोच दाखवला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका कायम, मुंबईतील सहकारी बँकेवर कारवाई, 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका कायम, मुंबईतील सहकारी बँकेवर कारवाई, 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
Dr. Sejal Pawar : डॉ. सेजल पवारच्या अडचणीत वाढ, के.ई.एम. कडून मोठी कारवाई, 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं पण टांगती तलवार कायम
डॉ. सेजल पवारच्या अडचणीत वाढ, के.ई.एम. कडून मोठी कारवाई, 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं पण टांगती तलवार कायम
MNS On Jain Community White Line Controversy Mumbai Road: पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारणार; मनसेचा 3 वाजेपर्यंत अल्टिमेटम, BMC चे अधिकारी थिनर घेऊन पोहोचले, दादरमध्ये राडा!
पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारणार; मनसेचा 3 वाजेपर्यंत अल्टिमेटम, BMC चे अधिकारी थिनर घेऊन पोहोचले, दादरमध्ये राडा!
Pune Crime News: 'क्राइम पेट्रोल' पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्...; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या
'क्राइम पेट्रोल' पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्...; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या
जैन समाजाने बांगड्या भरल्या नाहीत; मनसेच्या संदीप देशपांडेंवर निलेश चंद्र मुनींचा पलटवार, जैन बांधवांनाही आवाहन
जैन समाजाने बांगड्या भरल्या नाहीत; मनसेच्या संदीप देशपांडेंवर निलेश चंद्र मुनींचा पलटवार, जैन बांधवांनाही आवाहन
Shreyas Iyer News : कर्णधार होताच श्रेयस अय्यरने मुंबईतील वरळीत घेतला आलिशान फ्लॅट; भाडं ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
कर्णधार होताच श्रेयस अय्यरने मुंबईतील वरळीत घेतला आलिशान फ्लॅट; भाडं ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
PM Kisan E-KYC : 30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?
30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?
Embed widget