नवी दिल्ली : NEET UG 2026 ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण राष्ट्रीय परीक्षा एजन्सी म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं Re-NEET 2026 चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार त्यांचं स्कोअर कार्ड अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर पाहू शकतात. नीट पेपरफुटीमुळं मुख्य परीक्षा रद्द करावी लागली होती.त्यानंतर पुन्हा एकदा नीट यूजी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. फेरपरीक्षा 21 जून 2026 ला आयोजित करण्यात आली होती. आता नीट यूजी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु होईल.
11.21 लाख उमेदवार यशस्वी
नीट यूजी परीक्षा 20 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती त्यापैकी 11.21 लाख विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. म्हणजेच पेपर लीक, परीक्षा रद्द होणे त्यानंतर पुन्हा परीक्षा घेण्यात आल्यानंतर विद्यार्थी मोठ्या संख्येनं उत्तीर्ण झाले आहेत.
पंजाब आणि हरियाणाचे विद्यार्थी टॉपवर
यंदा पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांशुल बन्सल संयुक्तरित्या प्रथम क्रमांकावर राहिले, दोघांनी 720 पैकी 715 गुण मिळवले.
निकालातील प्रमुख मुद्दे
19 उमेदवारांना 700 पेक्षा जास्त गुण138 उमेदवारांना 690 पेक्षा जास्त गुण1492 उमेदवारांना 650 पेक्षा जास्त गुण10160 उमेदवारांनाने 600 पेक्षा जास्त गुण
मुलींची कामगिरी
यावेळी 56.8 टक्के महिला म्हणजेच विद्यार्थिनी पात्रठरल्यात. 55.1 टक्के विद्यार्थी पात्र ठरलेत. 690 हून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमद्ये 93 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी पहिल्यांदा परीक्षा देणारे आहेत.
देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशातील विद्यार्थी नीट फेरपरीक्षा पास झाले आहेत. उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 1.7 लाखांहून अधिक विद्यार्थी पास झाले आहेत. लक्षद्वीपमधून 43 उमेदवार पात्र ठरले आहेत. नीट फेरपरीक्षेचं आयोजनं 13 भाषांमध्ये करण्यात आलं होतं. यामध्ये हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगु, मराठी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, उडिया, पंजाबी, आसामी आणि उर्दू भाषेचा समावेश आहे.
पुढे काय?
आता एमीबीबीएस आणि बीडीएसच्या ऑल इंडिया कोटा काऊन्सिलिंग कमिटीकडून करण्यात येईल. राज्याचा कोटा काऊन्सिलिंग राज्य सरकारे आयोजित करतील. विद्यार्थ्यांनी खोटे कॉल, प्रवेश देण्याचं आमिष यापासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI