Online School Demand: आखाती (Gulf) प्रदेशात सुरू असलेल्या युद्धाचा आणि संघर्षाचा परिणाम जगभरावर आणि विशेषतः आता भारतावर होताना दिसत आहे. परिणामी वर्षभर देशवासियांनी सोनं (Gold) खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा (Petrol Diesel) वापरही कमीत कमी करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं. तसंच शाळांनीही ऑनलाईन वर्ग सुरु करावेत असंही नरेंद्र मोदी म्हणाले होते. सलग दोन दिवस नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर पेट्रोल डिझेलचा कमीत कमी वापर व्हावा यासाठी देशातील शाळांमध्ये ऑनलाईन वर्ग तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यासंदर्भात पालक संघटनेने मागणी केलीआहे.
Online School Demand: राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, केंद्रीय शिक्षण मंत्रालयसह राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला विनंती पत्र
इंडिया वाईड पेरेंट्स असोसिएशनकडून या सगळ्या संदर्भात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग, केंद्रीय शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांना विनंती पत्र सादरकरण्यातआलेआहे. सध्याची परिस्थिती पाहता, पंतप्रधानांनी इंधनाचा जबाबदारीने वापर करण्याच्या केलेल्या आवाहनानुसार, इंधन पुरवठ्याची परिस्थिती स्थिर होईपर्यंत शाळांना तात्पुरते ऑनलाइन वर्ग सुरू करण्याबाबत आवश्यक निर्देश/सूचना जारी करण्याचा विचार करावा, अशी विनंती सरकारकडे पालक संघटनेकडून करण्यात आली आहे.
Petrol Diesel: संकटकाळात उपलब्ध इंधन संसाधनांच्या कार्यक्षम व्यवस्थापनास मदत होईल
दरम्यान, या सगळ्यामुळे एकीकडे शिक्षण सुरू राहील, तसेच विद्यार्थी, पालक आणि शालेय वाहतूक पुरवठादारांची गैरसोय व त्रास कमी होईल, असे या पत्रात म्हटले आहे. अशा उपायामुळे अनावश्यक प्रवास टाळण्यास आणि या संकटकाळात उपलब्ध इंधन संसाधनांच्या कार्यक्षम व्यवस्थापनास देखील मदत होईल, असं मत पालकांकडून सुचवण्यात आला आहे.
नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली? (Narendra Modi On Gold Petrol Diesel)
- सोन्याची खरेदी टाळा
- पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा
- वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
- परदेश प्रवास टाळा
- खाद्यतेलाचा वापर कमी करा
- नैसर्गिक शेतीचा अवलंब करा
- स्वदेशी उत्पादनं वापरा
संबंधित बातमी:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI