NIRF Ranking 2022 : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इंस्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (NIRF)द्वारे गुरूवारी महाविद्यालयांचे मानांकन घोषीत करण्यात आले आहे. दरवर्षी एनआयआरएफद्वारे विविध श्रेंणींमधील महाविद्यालयांचे रॅंकींग घोषीत करण्यात येते. या रँकिंगमध्ये दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजने प्रथम स्थान पटकावले.  आयआयटी-मद्रासला एकूण शैक्षणिक संस्थांच्या श्रेणीत अव्वल स्थान मिळाले आहे. तर आश्चर्याची बाब म्हणजे देशातल्या दहा सर्वोत्तम विद्यापीठात तसेच महाविद्यालयात महाराष्ट्रातील एकाही महाविद्यालय किंवा विद्यापीठाचे नाव नाही. तर ओव्हर आँल कँटेगरीत आयआयटी मुंबई मात्र तिसऱ्या स्थानावर असल्याचे आढळले. 



केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) रँकिंग 2022 जारी केले. प्लॅटफॉर्मच्या अधिकृत वेबसाइट nirfindia.org वर तुम्ही ही रँकिंग तपासू शकता. 11 श्रेणींसाठी NIRF इंडिया रँकिंग 2022 जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूणच, विद्यापीठे, व्यवस्थापन, महाविद्यालये, फार्मसी, वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, एआरआयआयए कायदा आणि संशोधन संस्थांचा समावेश आहे. रँकिंग फ्रेमवर्क शिक्षण, शिक्षण आणि संसाधने (TLR), संशोधन आणि व्यावसायिक सराव (RP), ग्रॅज्युएशन आउटकम (GO), आउटरीच आणि समावेश (OI) आणि परसेप्शन (PR) च्या पॅरामीटर्सच्या पाच व्यापक सामान्य गटांच्या अंतर्गत संस्थांचे रॅंकिंग करण्यात येते. पॅरामीटर्सच्या या पाच गटांपैकी प्रत्येकासाठी दिलेल्या संख्यांच्या बेरजेवर आधारित रँक दिल्या जातात. गेल्या वर्षीप्रमाणेच आयआयटी-मद्रासला एकूण शैक्षणिक संस्थांच्या श्रेणीत अव्वल स्थान मिळाले आहे. दुसरीकडे, आयआयएससी बंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे. 


NIRF Ranking 2022: सलग 3 वर्षे सर्वोत्कृष्ट महाविद्यालय
1- मिरांडा हाऊस
2- हिंदू कॉलेज
3- प्रेसिडेन्सी कॉलेज, चेन्नई
4- लॉयाला कॉलेज, चेन्नई
5- LSR
6- PSGR कृष्णम्मल कॉलेज फॉर वुमन, कोईम्बतूर
7- आत्माराम सनातन धर्म महाविद्यालय
8- सेंट झेवियर्स कॉलेज, कोलकाता
9- रामकृष्ण मिशन, हावडा
10- किरोरी माल कॉलेज, नवी दिल्ली


NIRF Ranking 2022: Engineering Colleges
NIRF Ranking 2022: टॉप 5 इंजीनियरिंग कॉलेज
IIT मद्रास
IIT दिल्ली
IIT बॉम्बे
IIT कानपुर
IIT खड़गपुर


NIRF Ranking 2022: सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालये
1- एम्स दिल्ली
2- PGMIER, चंदीगड
3- ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर


NIRF Ranking 2022: Top University in India for Research NIRF List 2022



1. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंस (आईआईएससी बैंगलोर)


2. आईआईटी मद्रास (IIT Madras)


3. आईआईटी दिल्ली (IIT Delhi)



एकूण श्रेणी (Overall Category)


1. IIT मद्रास


2. IISc बंगलोर


3. IIT बॉम्बे


4. आयआयटी दिल्ली


5. आयआयटी कानपूर


6. IIT खरगपूर


7. IIT रुरकी


8. IIT गुवाहाटी


9. एम्स नवी दिल्ली


10. JNU नवी दिल्ली (JNU)


NIRF Ranking 2022: Top Pharmacy Colleges

1. जामिया हमदर्द, नवी दिल्ली (Jamia Hamdard)


2. नेशनल इंस्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एजुकेशन एंड रिसर्च, हैदराबाद (NIPER Hyderabad)


3. पंजाब यूनिवर्सिटी, चंदीगड (Punjab University)


4. नेशनल इंस्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एजुकेशन एंड रिसर्च, मोहाली (NIPER Mohali)


5. बिड़ला इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एंड साइंसेस (BITS Pilani)


6. जेएसएस कॉलेज ऑफ फार्मेसी, ऊटी (JSS Pharmacy College)


7. इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी, मुंबई


8. जेएसएस कॉलेज ऑफ फार्मेसी, मैसूर


9. मणिपाल कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल साइंसेस, मणिपाल (Manipal Pharmacy College)


10. एनआईपीईआर अहमदाबाद


Top MBA Colleges in India List 2022
1. आईआईएम अहमदाबाद (IIM Ahmedabad)


2. आईआईएम बैंगलोर (IIM Bangalore)


3. आईआईएम कोलकाता (IIM Calcutta)


4. आईआईटी दिल्ली


5. आईआईएम कोझीकोड (IIM Kozhikode)


6. आईआईएम लखनऊ (IIM Lucknow)


7. आईआईएम इंदौर (IIM Indore)


8. जेवियर लेबर रिलेशंस इंस्टीट्यूट (XLRI Jamshedpur)


9. नेशनल इंस्टीट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग, मुंबई


10. आईआईटी मद्रास


Top Dental College in India List 2022
1. सविता इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल एंड टेक्निकल सायन्स, चेन्नई (SIMATS Chennai)


2. मणिपाल कॉलेज ऑफ डेंटल साइंसेस, मणिपाल (Manipal Dental College)


3. डॉ. डीवाई पाटिल विद्यापीठ, पुणे (DY Patil Vidyapeeth)



Top Medical Colleges in India List 2022
1. एम्स दिल्ली (AIIMS Delhi)


2. पीजीआईएमईआर चंडीगढ़ (PGIMER Chandigarh)


3. CMC Vellore


4. NIMHANS Bangalore


5. BHU Varanasi


6. JIPMER Puducherry


7. SGPGIMER Lucknow


8. अमृता विश्व विद्यापीठम, कोयंबटूर


9. श्री चित्रा तिरुणाल इंस्टीट्यूट फॉर मेडिकल साइंसेस एंड टेक्नोलॉजी, तिरुवनंतपुरम


10. कस्तूरबा मेडिकल कॉलेज, मणिपाल (KMC Manipal)



NIRF Ranking 2022: Best Law Colleges


1. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी, बंगलोर


2. राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नवी दिल्ली (NLU दिल्ली)


3. सिम्बायोसिस लॉ स्कूल, पुणे


 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI