NET Exam : बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक राहुल पालके (Rahul Palke) यांनी तब्बल 5 विषयात नेट परीक्षा (NET Exam) उत्तीर्ण करत मोठं यश मिळवलंय. शिवाजी महाविद्यालयात इंग्रजी विषयात सहाय्यक पदावर कार्यरत असणारे डॉ. राहुल भगवान पालके यांनी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत हिंदी विषयात नेट( राष्ट्रीय पात्रता चाचणी) उत्तीर्ण झाले आहेत. यापूर्वी ते अर्थशास्त्र, वुमेन स्टडीज आणि इंग्रजी विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण झाले होते. आता त्यांनी हिंदी परिक्षेतही मोठं यश मिळवलंय.
नेट आणि सेट तब्बल 16 परिक्षा उत्तीर्ण
विशेष म्हणजे यांनी राहुल पालके नेट आणि सेट अनेकदा दिली आहे. यामध्ये ते 16 व्यांदा उत्तीर्ण झालेले आहेत. या परीक्षेस हिंदी विषयासाठी 60,369 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी 44047 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 44047 उमेदवार बसलेले होते. या परीक्षेत डॉ . पालके यांना एकूण 160 गुण प्राप्त झाले असून पर्सेंटाईल स्कोर 77.26 असा आहे. अगोदर ते या परीक्षा इंग्रजीत 11 वेळा, मराठीत 2 वेळा, वुमेन स्टडीज व अर्थशास्त्र या विषयांत प्रत्येकी 1 वेळा उत्तीर्ण झालेले आहेत. त्यांच्या या यशात यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती ग्रंथालयाचा सिंहाचा वाटा असल्याचं ते सांगतात.
प्राध्यापक राहुल पालेकेंवर कौतुकाचा वर्षाव
मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेत नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. त्यांना साहित्याबद्दल विशेष रुची असून त्यांची कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनावरील काव्यसंग्रह व समीक्षात्मक चरित्रग्रंथाचे प्रकाशन झालेले आहे.त्यांच्या या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव, उपाध्यक्ष श्री. नंदनजी जगदाळे, सचिव श्री. पी.टी. पाटील, उपसचिव श्री.ए.पी.देबडवार, खजिनदार श्री.जयकुमार शितोळे, प्राचार्य डॉ. ए.बी.शेख, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. समाधान पवार, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अंगणवाडी सेविका भरतीसाठी शिक्षण किती असावे? वयाची मर्यादा काय? महत्त्वाच्या 15 अटी वाचा एका क्लिकवर!
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI