NEET UG Result 2023:  नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून नीट युजी 2023 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. तामिळनाडूतील प्रबंजन जे आणि आंध्र प्रदेशातील बोरा  वरुण चक्रवर्ती 99.99 टक्क्यांसह देशात प्रथम तर राज्यात श्रीनिकेत रवीनं पहिला क्रमांक  पटकावला. श्रीनिकेत रवी हा देशातून सातव्या क्रमांकावर आहे.


देशभरातून 20 38596 विद्यार्थ्यांनी  ही परीक्षा दिली होती. त्यातील 1145976 विद्यार्थी हे पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेश राज्याचे 1,39,961 विद्यार्थी परीक्षेच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहे त्यानंतर महाराष्ट्रचे 1,31,008 विद्यार्थी आणि राजस्थान राज्यातील 1,00,316 विद्यार्थी हे सर्वाधिक पात्र ठरले आहे. पुढील प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 720 पैकी 137 गुण (50 परसेन्टाईल ) आवश्यक आहे. तर ओबीसी, एससी ,एसटी या प्रवर्गातील उमेदवारांना 720 पैकी 107 गुण (40 परसेन्टाईल )आवश्यक आहे.


रँक अनपेक्षित होता 


खारचा रहिवासी असलेला श्रीनिकेतन दुपारी 3 वाजल्यापासून निकालाची वाट पाहत होता.निकाल आल्यानंतर  श्रीनिकेतन म्हणाला,  "रँक अनपेक्षित होता पण मला माहित होते की मी चांगली कामगिरी करणार आहे. मला खूप आनंद आहे की मी माझ्या पालकांप्रमाणे चांगले गुण मिळवले आहेत." श्रीनिकेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) प्रवेश घेणार आहे. (NEET UG result 2023) 


श्रीनिकेतनसह राज्यातील दोन विद्यार्थी टॉप 50 मध्ये


श्रीनिकेतनसह राज्यातील तनिष्क देवेंद्र भगत (AIR 27) आणि रिद्धी वजारिनकर ( AIR 44)  या दोन विद्यार्थ्यांनी टॉप 50 मध्ये स्थान मिळवले आहे. महाराष्ट्राची उत्तीर्णांची टक्केवारी 47.84% आहे. महाराष्ट्रचे 1,31,008 विद्यार्थी आणि राजस्थान राज्यातील 1,00,316 विद्यार्थी हे सर्वाधिक पात्र ठरले आहे.  एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयुएम, बीएसएमएस या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या नीट युजी 2023 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 
पुढील प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी 720 पैकी 137 गुण (50 परसेन्टाईल ) आवश्यक आहे. तर ओबीसी, एससी ,एसटी या प्रवर्गातील उमेदवारांना 720 पैकी 107 गुण (40 परसेन्टाईल )आवश्यक आहे.499 शहरातील 4097 केंद्रावर परीक्षा पार पाडली. 14 परीक्षा केंद्र देशाबाहेरही होते.  मराठी, हिंदी, गुजरातीसह 13 भाषांमध्ये नीट परीक्षा पार पडली होती.   


NEET UG result 2023: Toppers list


Rank 1 - प्रबंजन जे 
Rank 2 - बोरा वरुण चक्रवर्ती 
Rank 3 - कौस्तव बाउरी 
Rank 4 - प्रांजल अगरवाल 
Rank 5 - ध्रुव आडवान 
Rank 6 - सूर्य सिद्धार्थ एन 
Rank 7 - श्रीनिकेत रवि 
Rank 8 -स्वयं शक्ति त्रिपाठी 
Rank 9 - वरुण एस
Rank 10 - पार्थ खंडेलवाल 


हे ही वाचा :                 


शिक्षकांसाठी खुशखबर! राज्यातील 2 हजार 384 शिक्षक होणार आता केंद्रप्रमुख; कोणत्या जिल्ह्यात किती जागा?


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI