नाशिक :  वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (NEET UG Result ) महिन्यात घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत आशिष भराडीया हा विद्यार्थी दिव्यांगामध्ये देशात प्रथम आला आहे.तर जनरल कॅटेगिरीमध्ये देशात त्याचा 722 रँक आला आहे. या यशाचे नाशिकसह जिल्हाभरात कौतुक होत आहे. 


 मे महिन्यात घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून या परीक्षेत आशिष भराडीया हा विद्यार्थी अपंगांमध्ये देशात प्रथम आला. आशिष हा नाशिक येथील सुप्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद भराडीया आणि डॉ. वैशाली भराडीया यांचा मुलगा आहे.


दिव्यांगावर मात करत देशात पहिला


नीट परीक्षेला यावर्षी देशभरातून 21 लाख विद्यार्थी बसले होते. देशातील 499 शहरांमध्ये व परदेशातील 14 शहरांमध्ये ही परिक्षा घेण्यात आली 13 भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली. यात आशिष देखील दिव्यांग कॅटेगीरीतुन परीक्षेला बसलेला होता. या परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेत होता. त्याच जोरावर हे दैदिप्यमान यश मिळवले. प्रथम आलेला आशिष भराडीया लहान असताना ऐकण्यास येत नव्हते, त्यामुळे त्याच्या कानावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यानंतर त्याने आपल्या अभ्यासात सातत्य ठेवत, दिव्यांगावर मात करत देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.


दरम्यान आशिषचे प्राथमिक शालेय शिक्षण नाशिकच्या फ्रावशी इंटरनॅशनल स्कुलमध्ये झाले आहे. बारावीच्या परीक्षेत त्याला 85 टक्के गुण मिळाले आहेत. तर नीट परीक्षेत त्याला 720 पैकी 690 गुण मिळाले आहेत. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे आशिषचा भाऊ विश्वेश भराडीया यानेही यापूर्वी अशाच प्रवेश परीक्षेत लक्षणीय यश मिळवत देशात 51 वा क्रमांक पटकावला होता. सध्या ते दिल्लीतील एम्सममध्ये कार्यरत आहेत.


आठ तास अभ्यास


देशभरातून नीट परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात. त्यासाठी प्रचंड मेहनत देखील विद्यार्थ्यांकडून केली जाते. आशिषने देखील नीट परिक्षेच्या तयारीसाठी प्रचंड मेहनत घेतली. त्याचबरोबर आशिषने खासगी क्लास लावला होता. तो दररोज किमान आठ तास अभ्यास करत होता. सातत्यपूर्ण अभ्यासामुळेच हे यश मिळाले असल्याची भावना आशिषने व्यक्त केली. 


देशभरातून 2038596 विद्यार्थ्यांनी  ही परीक्षा दिली होती. त्यातील 1145976 विद्यार्थी हे पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेश राज्याचे 1,39,961 विद्यार्थी परीक्षेच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहे 


हे ही वाचा :


'नीट'चा लातूर पॅटर्न... 1200 हून जास्त विद्यार्थ्यांना 500 पेक्षा जास्त मार्क्स, एकाच जिल्ह्यातून दोन-अडीच हजार मुलं डॉक्टर होणार


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI