NEET UG Re​ Exam नवी दिल्ली : देशभरात पदवी स्तरावरील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नीट यूजी परीक्षा (NEET UG) आयोजित केली जाते. या परीक्षेतील गैरप्रकारांमुळं नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नीट यूजी परीक्षा गैरप्रकार प्रकरण सुप्रीम कोर्टात देखील गेलं आहे. एनटीएनं या प्रकरणात 1563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आयोजित केली होती. मात्र, यापैकी केवळ 813 विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षा दिली. एनटीए तर्फे याबाबत माहिती देण्यात आली आहे.  


नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 1563 पैकी 813 विद्यार्थ्यांनी नीट फेरपरीक्षा दिली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सात केंद्रांवर नीट यूजी फेरपरीक्षा आयोजित करण्यात आली होतं. 5 मे रोजी नीट यूजी सहा केंद्रांवर उशिरानं सुरु झाल्यानं नुकसान भरपाईसाठी ग्रेस अंक दिले गेले होते. ग्रेस गुणांमुळं वाद वाढताच फेरपरीक्षा घ्यावी, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं. रविवारी झालेल्या फेरपरीक्षेला केवळ 813 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.  


वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशासाठी नीट यूजी परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे आरोप झाले होते. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं फेरपरीक्षा आयोजित करण्यात आली होती. रविवारी एनटीएनं बिहारमधील परीक्षा केंद्रावर फेर परीक्षा देण्यासाठी आलेल्या 17 विद्यार्थ्यांना मनाई केली होती. यापूर्वी देखील 63 विद्यार्थ्यांना परीक्षेत गैरप्रकार केल्यानं परीक्षा देण्यास रोखण्यात आल्याचं सांगितलं होतं. गुजरातच्या गोध्रामध्ये देखील 30 विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून रोखण्यात आलं.  


नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे बिहार पासून महाराष्ट्रात असल्याचं समोर आलं आहे. विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षेत गैर प्रकार झाल्याच्या संशयावरुन ती रद्द करण्यात आली होती. सीएसआयआर नेट देखील लांबणीवर टाकण्यात आली. तर, नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून घेतली जाणारी नीट पीजी परीक्षा देखील लांबणीवर टाकण्यात आली आहे.  


दरम्यान, संसदेत 18 व्या लोकसभेचं कामकाज आजपासून सुरु होणार आहे. लोकसभेत विरोधी पक्ष नीट यूजी, नीट पीजी परीक्षा आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेटच्या मुद्यावरुन आक्रमक होण्याची शक्यता आहे.  या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येऊ शकतात. 


संबंधित बातम्या : 



मोठी बातमी : रविवारी होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलली, NTA DG सुबोध कुमार यांची हकालपट्टी; आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI