NEET-PG Exam 2025 : नीट पीजी 2025 परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं आहे की, परीक्षा एकाच सत्रात घेण्यात यावी, जेणेकरून पारदर्शकता टिकेल आणि सर्व उमेदवारांना समान संधी उपलब्ध होईल. नीट पीजी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, त्या सुनावणीदरम्यान कोर्टाने ती मागणी फेटाळून लावत एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. या निर्णयानंतर नीट पीजी 2025 ची परीक्षा 15 जून रोजी देशभरात एकाच सत्रात पार पडणार आहे.

Continues below advertisement

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास प्रश्नपत्रिकांच्या कठीणतेच्या स्तरात भिन्नता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे असमानता आणि मनमानीची शक्यता वाढते, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिका अचूकपणे एकसमान कठीणतेच्या असतील, याची खात्री देता येत नाही. त्यामुळे सर्व उमेदवारांसाठी समान निकष आणि संधी सुनिश्चित करण्यासाठी परीक्षा एकाच सत्रात घेणे आवश्यक आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

परीक्षा दोन सत्रांमध्ये होण्याच्या चर्चांना पूर्णविराम 

दरम्यान, 15 जून रोजी होणाऱ्या NEET-PG 2025 परीक्षेसाठी आवश्यक तयारी करण्यासाठी अजूनही वेळ उपलब्ध आहे, असे स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. परीक्षेसाठी केंद्र निश्चित करण्यासाठी परीक्षा मंडळाकडे पुरेसा वेळ आहे, असेही कोर्टाने नमूद केले. त्यामुळे परीक्षा दोन सत्रांमध्ये होण्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Continues below advertisement

2 जूनला मिळणार एक्झाम सिटी स्लिप 

NEET PG परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना एक्झाम सिटी स्लिप 2 जून 2025 रोजी मिळणार आहे. ही सिटी स्लिप अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केली जाणार नाही. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परीक्षा मंडळ (NBEMS) उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर सिटी स्लिप पाठवणार आहे. उमेदवारांनी ती स्लिप तिथून डाऊनलोड करून घ्यावी.

परीक्षेच्या चार दिवस आधी मिळणार अॅडमिट कार्ड 

परीक्षेच्या चार दिवस आधी NEET PG 2025 चे अ‍ॅडमिट कार्ड अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर उपलब्ध करून दिले जाईल. अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून उमेदवारांना ते डाऊनलोड करता येईल. हॉल तिकीटाशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, हे सर्व उमेदवारांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

आणखी वाचा

UPSC Website Changed : पूजा खेडकरसारख्या प्रकरणांना बसणार चाप, UPSC ची वेबसाइट बदलली, आता नव्या पोर्टलवरूनच करावा लागणार अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI