NEET Exam paper leak: देशभरात 3 मे रोजी घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचा (NEET Exam) पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याने परीक्षा घेणाऱ्या एनटीएने ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खरंतर भविष्यात डॉक्टर (Doctor Exam) बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन दोन वर्ष किंबहुना त्याहून अधिक वर्ष रात्रंदिवस मेहनत घेऊन विद्यार्थी अभ्यास करतात. मात्र, या अशा महत्त्वपूर्ण परीक्षेचा पेपर फुटल्याने ही परीक्षाच त्यानंतर रद्द करण्यात आली. यामुळे देशभरात ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं व नैराश्याच वातावरण निर्माण झालं आहे. अनेक ठिकाणी या निर्णयाविरोधात आंदोलनही झालीत. मात्र, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करत एनटीएने हीच परीक्षा रद्द केली. (NEET Exam Latest Updates)
याच नैराश्यातून उत्तर पश्चिम दिल्लीतील आदर्श नगर परिसरातील नुकतीच नीटची परीक्षा दिलेल्या एका 21 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या (Suicide news) केली आहे. या विद्यार्थिनीने यावेळेस या परीक्षेत चांगले मार्क्स मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. तर दुसरीकडे राजस्थानच्या सिकर मधील एका 22 वर्षीय प्रदीप मेघवाल या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. प्रदीपने यापूर्वी दोन वेळेस ही परीक्षा दिली होती. मात्र, यावेळी त्याने या परीक्षेत 650 मार्क मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. तर गोवा राज्यातीलही एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. खरंतर परीक्षा ही फक्त अभ्यासक्रमापूरतीच असते. विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा पुन्हा परीक्षा देऊन आपल्याला कणखर व मजबूत करावं व कुठलही टोकाचं पाऊल उचलू नये अस आवाहन "एबीपी माझा" कडून आम्ही करत आहोत.
नीट पेपरफुटीनंतर लातूरमध्ये सीबीआयचं धाडसत्र सुरूच आहे. नीट पेपर लीक प्रकरणात एका खासगी ट्युशन चालकाच्या संबंधित संस्थांवर पुण्यातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातीलही सीबीआयने धाडी टाकल्या. सीबीआयच्या पथकाने संबंधित ठिकाणी जवळपास एक ते दीड तास तपास करत कागदपत्रे आणि इतर महत्त्वाची माहिती पडताळून पाहिली. सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णीला अटक केल्यानंतर आता सुतमील परिसरातील एका खाजगी ट्युशन चालकाच्या घरी सीबीआयच्या पथकाने छापा टाकला. क्लास चालकाच्या घरी सीबीआयनं 11 तास तपासणी केली. क्लास चालकाकडे आढळलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. मोबाईल, संगणक आणि विद्यार्थ्यांशी संबंधित नोंदींचीही पडताळणी करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. त्याचप्रमाणे ज्या भागात त्यांची ट्युशन चालते त्या ठिकाणी पथकाने जाऊन अनेक नोंदी घेतल्या. सुमारे 11 तास तपासणी केल्यानंतर सीबीआयचे पथक काही कागदपत्रे आणि माहिती सोबत घेऊन निघून गेले. मात्र, पुढील कारवाईबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
MAHA TET 2026 news: महाटीईटी परीक्षा 21 जून ऐवजी 28 जूनला होणार
आता महाटीईटी परीक्षा 21 जून ऐवजी 28 जूनला होणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठीची आवश्यक असलेली नीट यूजी परीक्षा 3 मे रोजी पार पडली होती. मात्र, त्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यानं संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली. आता ही परीक्षा 21 जूनला होणार आहे. त्यामुळे यामुळं महाटीईटी परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतला आहे. नीट यूजी आणि महाटीईटी या दोन्ही परीक्षांची बहुतांशी केंद्र एकच येत असल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाटीईटी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि परीक्षार्थींचं हित लक्षात घेत तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. यामुळं टीईटी परीक्षा 21 जून ऐवजी 28 जूनला होणार आहे.
आणखी वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI