UGC NET Exam 2024 नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) तीन परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामध्ये यूजीसी नेट परीक्षेचा (UGC NET Exam) देखील समावेश आहे. 18 जूनला यूजीसी नेट परीक्षा पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवसी ती परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली होती.21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान या परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. यूजीसी नेट, एनसीईटी आणि सीएसआयआर नेट परीक्षेच्या तारखा एनटीएनं जाहीर केल्या आहेत. डार्कनेटवर पेपर लीक झाल्यानंतर एका आठवड्यानंतर यूजीसी नेट परीक्षा रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली होती.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)नं यूजीसी नेट परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. यूजीसी नेट जून 2024 परीक्षा 21 ऑगस्ट 2024 ते 04 सप्टेंबर 2024 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. याशिवाय एनसीईटी 2024 परीक्षा 10 जुलै रोजी होणार आहे. संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट 25 ते 27 जुलै दरम्यान होणार आहे. अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा (एआईएपीजीईटी) 2024 ही नियोजित वेळापत्रकानुसार 6 जुलै रोजी घेतली जाणार आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं काय म्हटलं?
राष्ट्रीय चाचणी संस्थेने रद्द केलेल्या आणि पुढे ढकललेल्या परीक्षांच्या नवीन तारखांची घोषणा शुक्रवारी रात्री उशिरा केली. त्यात कथित अनियमिततेच्या आरोपांवरून वादात सापडलेल्या यूजीसी नेटचा समावेश आहे. संयुक्त सीएसआयआर-यूजीसी नेट २५ ते २७ जुलैदरम्यान आयोजित केली जाईल, तर यूजीसी नेट जून २०२४ परीक्षा २१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान घेतली जाईल.
पेपर लीकच्या मुद्यावरुन विद्यार्थी आक्रमक
नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या विविध परीक्षांमधील कथित अनियमितता प्रकरणी विद्यार्थी दिल्लीच्या जंतर मंतरवर बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. शुक्रवारी तिसऱ्या दिवशी देखील धरणे आंदोलन सुरु होतं. डाव्या पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटना ऑल इंडिया स्टूडेंट एसोसिएशन (आईसा)आणि दिल्ली विद्यापीठातील क्रांतिकारी युवा संगठन (केवायएस) यांच्यासह इतर प्रमुख विद्यार्थी संघटना धरणे आंदोलन जंतर मंतरवर करत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी विसर्जित करणे याशिवाय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
संबंधित बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI