National Exit Test : 'नॅशनल एक्झिट टेस्ट' अर्थात 'NEXT' परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. देशातील 2019 बॅचच्या अंतिम वर्षाच्या MBBS विद्यार्थ्यांची नॅशनल एक्झिट टेस्ट (NEXT) पुढील वर्षी दोन टप्प्यात घेतली जाणार आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यातील परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पदवी आणि वैद्यकीय महाविद्यालयातील पीजी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे. ही परीक्षा AIIMS दिल्लीद्वारे घेतली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने एमबीबीएस कोर्स पूर्ण केल्यानंतर देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील अशा सर्व विद्यार्थ्यांची 'नॅशनल एक्झिट टेस्ट' अर्थात 'NEXT' घेण्याचा निर्णय 2019 साली घेतला आहे . देशातील चांगल्या गुणवत्ता धारक डॉक्टरांची संख्या वाढविणे असा आहे. त्यामुळे यावर्षी देशातील एम. बी. बी. एस. च्या अंतिम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे.राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे एथिक्स अॅन्ड मेडिकल रजिस्ट्रेशन बोर्ड (ईएमआरबी) चे सदस्य डॉ. योगेंद्र मलिक म्हणाले, नेक्स्ट परीक्षेचा पहिला टप्पा पास केल्यानंतर एक वर्षाची इंटर्नशिप करण्यात येणार आहे. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पीजी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार आहे. इंटर्नशिप झाल्यानंतर वैद्यकीय व्यवसायाचा परवाना घेणे व वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंदणी करण्यासाठी परीक्षेचा दुसरा टप्पा पास करावा लागणार आहे.
NEXT च्या तयारीसाठी 28 जुलैला मॉक टेस्ट घेण्यात येणार आहे. आजपासून (28 जून) पासून याकरता नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी नोंदणी करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेत सात पेपर असणर आहे. तसेच विदेशातून डिग्री घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना देखील भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील परीक्षा झाल्यानंतर एक वर्ष इंटर्नशिप करावी लागणार त्यांनंतर विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यासाठी परीक्षा देता येणार आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने देशातील सर्व राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयाना पत्र पाठवून अंतिम वर्ष एम बी बी एस च्या विद्यार्थ्यांची माहिती व ते कधी कोर्स पूर्ण करतील..? याविषयी माहिती मागितली आहे. यंदा एम बी बी एस च्या अंतिम वर्षाला असणाऱ्या देशातील सर्वच विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI