NEET Result 2022 : नुकताच नीट (नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रेंस टेस्ट - National Eligibility Entrance Test)  परीक्षेचाचा निकाल लागला.  यामध्ये आदिवासी भागातील शेतमजुराचा मुलगाही पास झाला. अतिशय प्रतिकुल प्रस्थितीत त्यानं नीट परीक्षेत यश मिळवलं आहे. अरुण लालसू मट्टामी असं त्या होतकरु मुलाचं नाव आहे. मारिया गोंड आदिवासी जमातीतील अरुणला 450 गुण मिळाले आहेत. तो लवकरच शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे. 
अरुण म्हणाला, "मी भामरागड तालुक्यातील एका छोट्याशा गावातील रहिवासी आहे. माझे आई वडील शेतमजूर आहेत. आज हे यश एलएफयु मुळे मिळाले. मी डॉक्टर झाल्यावर माझ्या गावी येऊन रुग्णसेवा करणार आहे."  


आपण डॉक्टर व्हावं, असं स्वप्नं किती तरी जणांचं असतं. पण डॉक्टर व्हायचं म्हणजे त्यासाठी पास करावी लागते ती राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा. म्हणजेच नीट (NEET). ज्याच्या तयारीसाठी कोचिंगची गरज पडते आणि त्याची फी प्रत्येकाला परडवणारी नाही. अशा गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार होतं आहे ते पुण्यातील लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंटमुळे (Lift For Upliftment - LFU). 


यावर्षी एलएफयुचे साधारण दहा विद्यार्थी नीट उत्तीर्ण झाले असून लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतील. नीट परीक्षेत 720 पैकी, श्रेया बुटले हिला 600, प्रज्ञा जाधव हिला 540, बुशरा शेख ला 528, अरविंद चव्हाण ला 512, सानिया शेख ला 507 गुण मिळाले आहेत. खास मेळघाटातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या तीन वर्षापासून लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट (LFU) पुणे यांच्यामार्फत ‘उलगुलान’ नावाने वेगळी बॅच चालवील जाते.  गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्यासाठी 2015 साली लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंटची (Lift For Upliftment - LFU) स्थापना करण्यात आली.  पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ही संस्था स्थापन केली. सुरुवातीला पुण्यातील सरकारी महाविद्यालयातील अकरावी आणि बारावीच्या मुलांना कोचिंग दिलं जात असे. आता गेल्या पाच  वर्षांपासून स्वतंत्रपणे नीटच्या विद्यार्थ्यांना कोचिंग दिलं जातं आहे. जिथं आता 40 पेक्षा जास्त विद्यार्थी कोचिंग घेत आहेत.


बी.जे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या एलएफयु संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी (NEET) मोफत प्रशिक्षण देण्यात येते. या प्रकल्पाद्वारे गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे आणि भविष्यात अनेक चांगले डॉक्टर्स तयार व्हावेत या ध्येयाने प्रेरित होऊन सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. LFU पुणे च्या अथक परिश्रमाने मागील पाच वर्षात 75 पेक्षा अधिक MBBS, 15 पेक्षा अधिक BDS, 30 पेक्षा अधिक BAMS, 20 पेक्षा अधिक BHMS ला विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवले आहेत. यामाध्यामातून विद्यार्थ्यांचा बौद्धीक, शारीरिक त्याचप्रमाणे मानसिक विकास करण्याचा मुख्य उद्देश आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI