Mumbai University IDOL Exam : मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यापीठाच्या दुरस्थ आणि मुक्त शिक्षण विभागाच्या (IDOL) 13 ब्रँचच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा आजपासून सुरू होणार आहेत. मात्र या परीक्षांच्या हॉल तिकीटचा पत्ताच नाही, त्याच्या अपलोडिंगचे काम अद्याप सुरू असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. अनेक विद्यार्थ्यांना अद्याप हॉल तिकीट उपलब्ध झालं नसल्याने विद्यार्थी मात्र संभ्रमावस्थेत असल्याचं दिसतंय. 


मंगळवारपासून मुंबई विद्यापीठाच्या दुरस्थ आणि मुक्त शिक्षण विभागाच्या प्रथम वर्ष एम.ए., एम कॉम., एम. एसस्सी अशा एकूण 13 अभ्यासक्रमांच्या परीक्षा होत आहेत.  या परीक्षेला 800 विद्यार्थी बसणार आहेत. पण मंगळवारी परीक्षा आणि त्याच्या आदल्या दिवशी हॉल तिकिट अपलोड करण्यात आल्याचं समोर आलंय. तसेच 13 पैकी तीन विभागाच्या परीक्षांचे हॉल तिकीटच अद्याप उपलब्ध झालं नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून होत आहे. 


आदल्या दिवशी काही हॉल तिकीट अपलोड


काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटं अपलोड झाली असल्याची तर काही विद्यार्थ्यांच्या अपलोड होत असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. तर उद्या परीक्षा आणि आज हॉल तिकीट अपलोड? मुंबई विद्यापीठाची ही कुठली अजब पद्धत? असा प्रश्न युवा सेना सिनेट सदस्यांनी केला आहे.


परीक्षा नेमकी कुठल्या केंद्रावर द्यायची 


सोमवारी रात्रीपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नसल्याने मंगळवारचा पेपर नेमका कुठल्या केंद्रावर द्यायचा? किंवा कसा द्यायचा? असा प्रश्न त्यांना पडला आहे. 


हॉल तिकीट विद्यार्थ्यांच्या लॉगिन आयडीमध्ये अपलोड करण्यात आलं असल्याचं मुंबई विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे.  13 पैकी दहा अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे हॉल तिकीट अपलोड झाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र अजून अनेक विद्यार्थ्यांना हॉल तिकीट प्राप्त झालेले नाही अशी तक्रार आहे. 


या प्रकारावरून युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला चांगलेच धारेवर धरलं आहे. यावर मंगळवारी सकाळी ते कुलगुरूंची भेट घेणार असून त्यासंबंधी जाब विचारणार असल्याची माहिती आहे.


ही बातमी वाचा: 



                                                                       


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI