MPSC Exam and B.Ed CET Exam Date : एमपीएससी (MPSC Exam) आणि बीएड सीईटी परीक्षा (B.Ed CET Exam) एकाच दिवशी आली आहे. संभ्रमात असलेल्यांना परीक्षार्थींना सरकारने पर्याय दिला आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देण्यात येणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. 21 ऑगस्ट रोजी एकाच तारखेला एमपीएससी (MPSC Exam) आणि बीएड सीईटी परीक्षा (B.Ed CET Exam) आल्याने विद्यार्थी नाराज झाले होते. दोन्ही परीक्षा एकत्र देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर मोठी अडचण निर्माण झाली होती. मात्र आता यावर सरकारने तोडगा काढला आहे.
दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देणार - चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि बीएड सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट या एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला होता. एमपीएससी (MPSC) अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा 21 ऑगस्टला आहे. तर बीएड सीईटी परीक्षा 21 ऑगस्टपासून तीन दिवस आहे. यामुळे या दोन्ही परीक्षा एकाच तारखेला आल्या आहेत. यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी चिंतेत होते. एका परीक्षेला मुकावं लागणार की काय, अशी भावना आणि संभ्रम परीक्षार्थींच्या मनात होता. पण सरकारने यावर तोडगा काढला आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ : दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना सरकारचा 'हा' पर्याय
परीक्षार्थींनी सीईटी सेलशी संपर्क साधावा
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येण्याच्या गोंधळावर तोडगा सांगितला आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की, एमपीएससी (MPSC Exam) आणि बीएड सीईटी परीक्षा (B.Ed CET Exam) एकत्र देणाऱ्या विद्यार्थ्यांना तारखेबाबत पर्याय दिला जाईल. यासाठी परीक्षार्थींनी त्वरीत सीईटी सेलशी संपर्क साधावा. तेथे तुम्हाला दोन्ही परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Maharashtra Monsoon Assembly Session : '50 खोके एकदम ओक्के', विरोधकांची घोषणाबाजी; धनंजय मुंडेंच्या घोषणांनी लक्ष वेधून घेतलं
- Maharashtra Monsoon Assembly Session आता सांगा खरे मुख्यमंत्री कोण आहेत? : आदित्य ठाकरे
- Mohit Kamboj: मोहित कंबोज हा कोणाच्या चड्डीचा नाडा हे सगळ्यांना माहीत; मिटकरींचा हल्लाबोल
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI