MH SET Admit Card 2023 Released : महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेट परीक्षा (SET Exam) 2023 चे प्रवेशपत्र (Hall Ticket) प्रसिद्ध झाली आहेत. जे उमेदवार ही परीक्षा देत आहेत ते अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आणि नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या  setexam.unipune.ac.in या वेबसाईटवरून तुम्हाला तुमचे हॉल तिकीट पाहता येतील. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करू शकता. 


'या' तारखेला परीक्षा होणार 


MH SET 2023 ची परीक्षा 26 मार्च 2023 रोजी घेतली जाईल. ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून दोन सत्रात घेतली जाईल. पहिले सत्र सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुसरे सत्र सकाळी 11.30 ते 1.30 पर्यंत असेल.


पेपरचे स्वरूप कसे असेल?


महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत दोन पेपर असतील. पहिला पेपर 50 गुणांचा आणि दुसरा पेपर 100 गुणांचा असेल. परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न येतील, ज्यामध्ये चार पर्यायांपैकी एक निवडावा लागेल. सर्व प्रश्नांचा प्रयत्न करणे अनिवार्य आहे. 


'असे' प्रवेशपत्र डाऊनलोड करा



  • प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी, सर्वात आधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. setexam.unipune.ac.in ही वेबसाईट आहे.

  • येथे होमपेजवरील अॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.

  • त्यानंतर जे पेज ओपन होईल त्या नवीन पेजवर तुमचे लॉगिन तपशील भरा आणि एंटर बटणावर क्लिक करा.

  • आता तुमचे प्रवेशपत्र संगणकाच्या स्क्रीनवर दिसेल.

  • तुम्ही प्रवेशपत्र तपासून डाऊनलोड करा आणि तुम्हाला हवे असल्यास प्रिंट काढा. 

  • परीक्षेशी संबंधित इतर कोणतीही माहिती मिळविण्यासाठी किंवा तपशील पाहण्यासाठी, फक्त अधिकृत वेबसाईटला भेट द्या. इतर कोणत्याही माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका.


महत्त्वाच्या बातम्या : 


आझाद हिंद सेनेची भारतात एन्ट्री, इंडोनेशियात तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण अन् अटल बिहारी वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान; आज इतिहासात


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI