Maharashtra Board SSC Result 2023: गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे लवकरच दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 1 ते 5 जून दरम्यान लागण्याची शक्यता आहे.
Maharashtra SSC Result 2023 : निकालाची तयारी पूर्ण
दहावीच्या निकालाची (SSC Result 2023) तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे. दहावी बोर्डाच्या परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात आल्या. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाची परिस्थिती असल्याने शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र यावेळी शिक्षण मंडळाने ही सूट काढून घेण्यात आली होती. परिणामी याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा बारावीचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.97 टक्क्यांनी लागला.
Maharashtra SSC Result 2023 : कुठे पाहणार निकाल
बोर्डाने निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना तो ABP Majha वर पाहता येणार आहे. त्यासाठी MH10.ABPMajha.Com लिंकवर क्लिक करा. निकाल जाहीर झाल्यानंतर या लिंकवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन, झटपट कोणत्याही अडथळ्याविना निकाल पाहता येणार आहे. निकालाची वाट विद्यार्थी उत्सुकतेने पाहत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होत आहे. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 ने कमी झाली आहे.
Maharashtra SSC Result 2023 : एबीपी माझाच्या वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालीली स्टेप्स फॉलो करा
स्टेप 1 : सर्वात आधी एबीपी माझाच्या वेबसाईटवर लॉन ऑन करा.
स्टेप 2 : बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमच्यासमोर एक नवं पेज ओपन होईल, तिथे असलेल्या बॉक्समध्ये तुमचा सीट नंबर टाका.
स्टेप 4 : त्याखालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा (उदा. आईचं नाव SONALI असेल तर तुम्हाला SON लिहावं लागेल)
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
हे ही वाचा :
Maharashtra SSC Result 2023 : 10 वी नंतर काय कराल? 'या' क्षेत्रात करिअरच्या हजारो संधी, जाणून घ्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI