Maharashtra School Start Date : राज्यातील शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर होता. याबाबत शिक्षण विभागानं आता तारीख घोषित केली आहे. राज्यातील शाळा 13 जूनपासून सुरु होणार असल्याचं शिक्षण आयुक्तांनी पत्र काढत सांगितलं आहे. विदर्भातील शाळा मात्र 27 जूनपासून सुरू होणार आहेत. 


राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी एकवाक्यता आणि सुसंगती येण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडून निर्देश जारी करण्यात आले आहेत. आदेशात शैक्षणिक सत्र 2022 - 23 सुरू करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.  शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार राज्यातील शाळा आणि शैक्षणिक सत्र 13 जून पासून सुरू होणार आहे. तर विदर्भातील तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील शाळा 27 जून पासून सुरू होणार असल्याचं या निर्देशात म्हटलं आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी 15 जूनपासून तर विदर्भातील विद्यार्थ्यांनी 27 जूनपासून प्रत्यक्षात शाळेत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 


शाळा जरी 13 जून रोजी सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं असं आदेशात म्हटलं आहे. 13 आणि 14 जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहात शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण तसेच कोरोना संदर्भात उद्बोधन करायचं आहे, असं आदेशात म्हटलं आहे. शाळेत येणारे विद्यार्थी तसेच पालकांचं कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंघाने प्रबोधन करावं असं देखील आदेशात म्हटलं आहे. 


राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी राज्यातील शाळा  15 जून (Maharashtra School) रोजी सुरु होणार असल्याचं म्हटलं होतं. तर 13 जूनला फक्त पहिलीच्या शाळांसाठी पहिलं पाऊल हे कार्यक्रम होणार आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.  


वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं की, राज्यात सध्या मास्क कुठेही बंधनकारक नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बघून शाळा संदर्भात निर्णय घेतला जाईल. शाळा सुरू करण्यापूर्वी चाइल्ड टास्क फोर्स असेल किंवा आरोग्य विभाग त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ, असंही त्यांनी म्हटलं होतं.  


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI