Mahrashtra HSC Board: आज राज्यात बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल (HSC Board Result) जाहीर झाला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सर्व विभागीय मंडळाचे निकाल जाहीर केले. यावेळी इतर पालकांप्रमाणे खुद्द बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांचं देखील टेन्शन वाढलं होतं. याचं कारण म्हणजे गोसावींच्या मुलीने देखील या वर्षी बारावीची परीक्षा दिली होती आणि तिच्या निकालाची देखील त्यांना प्रतिक्षा होती.


खरंतर बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल म्हटल्यावर विद्यार्थ्यांप्रमाणे पालकांनाही तेवढंच टेन्शन असतं. त्यात राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे सुद्धा इतर पालकांप्रमाणेच एक पालक आहेत. गोसावी यांची कन्या संस्कृती हिने यावर्षी बारावीची परीक्षा दिली, तिने विज्ञान शाखेत 77.50 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.


बोर्डाच्या अध्यक्षांची मुलगी संस्कृती गोसावी हिने इंग्रजी विषयात 86 गुण, भूगोल विषयात 88 गुण, गणितामध्ये 69 गुण, भौतिकशास्त्र विषयात 55 गुण, रसायनशास्त्र विषयात 70, तर आयटी विषयात 97 असे एकूण 465 गुण मिळवले आहेत. संस्कृती ही पुण्यातील बाणेर येथील आदित्य ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. संस्कृतीला पुढे इंजिनिअरींगमध्ये करिअर करायचं असून तिला जेईई मेन्स या परीक्षमध्ये चांगले गुण मिळाले आहेत. राज्याची सीईटी परीक्षा सुध्दा तिने दिली आहे.


बारावी निकालाची विभागनिहाय आकडेवारी



  • पुणे : 93.34 टक्के 

  • नागपूर : 90.35 टक्के 

  • औरंगाबाद : 91.85 टक्के 

  • मुंबई : 88.13 टक्के  

  • कोल्हापूर : 93.28 टक्के 

  • अमरावती : 92.75 टक्के 

  • नाशिक : 91.66 टक्के 

  • लातूर : 90.37 टक्के 

  • कोकण : 96.25 टक्के 


राज्यातील नऊ विभागांपैकी सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा, तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा


मागीलवर्षी राज्याचा निकाल 94.22 टक्के होता, यावेळी तो 91.25 टक्के आहे. म्हणजेच, मागीलवर्षी पेक्षा यावर्षीचा निकाल 2.97 टक्क्यांनी कमी आहे. यंदाच्या बारावीच्या बॅचने प्रथमच बोर्डाचा पेपर दिला होता, याआधी दहावीची परीक्षा कोरोनामुळे झाली नसल्याने त्यांच्यासाठी बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव नवखाच होता आणि याचाच परिणाम निकालावर दिसून आला. दरवर्षीपेक्षा या वर्षीचा बारावीचा निकाल घसरला आहे. यंदा बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. याआधी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षेत अनेक बदल करण्यात आले होते.


कोरोनामुळे पहिल्या वर्षी परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. तर गेल्या वर्षी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आल्या होत्या. तसेच परीक्षांसाठी वेळ देखील वाढवून देण्यात आला होता. यंदा मात्र परीक्षा घेताना कोणतीही सवलत देण्यात आली नव्हती. परिणामी याचा परिणाम निकालावर पाहायला मिळत आहे. मात्र कोरोना आधीच्या म्हणजे फेब्रुवारी - मार्चमध्ये लागलेल्या निकालापेक्षा यावेळचा निकाल 0.59 ने अधिक आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या अगोदर निकाल 90.66 टक्के लागला होता.


 


हेही वाचा:



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI