HSC Exam Handwriting Scam: बारावी परीक्षेचा (HSC Exam) भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत तब्बल 372 पेपरमध्ये दोन हस्ताक्षरे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे या सर्व प्रकरणाची बोर्डाने गंभीर दखल घेत या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून यातील आरोपी राहुल भगवानसिंग ऊसारे आणि मनीषा भागवत शिंदे हे दोन प्राध्यापक फरार झाले आहेत. पोलिसांकडून (Police) त्यांच्या शोध सुरु असतानाच त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) न्यायालयात अर्ज सादर केला होता. मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाने यांनी दोन्ही अर्ज नामंजूर केले आहे. 


बारावी परीक्षेच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिका तपासत असताना दोन हस्ताक्षर आढळून आले होते. ज्यात एकूण 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर समोर आले. या प्रकरणी बोर्डाच्या चौकशी संमतीने चौकशीअंती राहुल ऊसारे आणि मनिषा शिंदे या दोन शिक्षकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच दोन्ही शिक्षक फरार झाले होते. तर पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान या दोन्ही शिक्षकांनी आपल्याला जामीन मिळावा म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. तर यावर झालेल्या सुनावणीअंती न्यायालयाने दोघांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. जामीन मंजूर झाल्यास आरोपींना कायद्याचा धाक राहणार नसल्याचे सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर सुनावणीअंति न्यायालयाने दोन्ही आरोपी प्राध्यापकांचा जामीन फेटाळला आहे.


पोलिसांनी एचएससी बोर्ड चौकशी समितीचा जबाब नोंदवला 


दरम्यान इयत्ता बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेतील अक्षरातील बदल प्रकरणातील दोन्ही आरोपी अद्याप फरारच आहे. तर पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात असून, त्या दृष्टीने तपास सुरु आहे. दरम्यान पोलिसांनी नुकताच या प्रकरणात एचएससी बोर्ड चौकशी समितीचा जबाब नोंदवला आहे. तसेच संबंधित उत्तरपत्रिका ताब्यात घेऊन त्यांची अक्षरतज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून दोन हस्ताक्षर आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना नोटीस पाठवून त्यांना जबाब नोंदवला जाणार आहे. तसेच या सर्व प्रकरणात आर्थिक व्यवहार झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे या सर्व दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरु आहे.  


उत्तरपत्रिका स्वतःकडे ठेवल्या...


बारावीच्या परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेत 372 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोन हस्ताक्षर आढळून आले. दरम्यान या प्रकरणी बोर्डाने चौकशी केली असता संबंधित उत्तरपत्रिका सोयगावचे शिक्षक राहुल भंगवान ऊसारे आणि मनिषा भागवत शिंदे यांनी तपासले असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे त्यांना 13 मार्चपर्यंत या उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे आदेश होते. मात्र त्यांनी उत्तरपत्रिका 25 दिवस स्वतःकडे ठेवून 8 एप्रिल रोजी बोर्डाकडे परत पाठवल्या होत्या. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. 


इतर महत्वाच्या बातम्या:


HSC Exam Scam : बारावी परीक्षेच्या 'हस्ताक्षर घोटाळा' प्रकरणी पोलीस 'त्या' 372 विद्यार्थ्यांचा जबाब नोंदवणार


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI