Amit Thackeray: विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर आता पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरूवात केली, मात्र काही ठिकाणी मतदारसंघात अद्याप उमेदवार ठरत नसल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे मित्रपक्ष, आणि नेत्यांमध्ये मैत्रीपुर्ण संबंध असल्याकारणाने उमेदवार देताना काही ठिकाणी चर्चा सुरू असल्याचं चित्र आहे. तर मनसे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिल्याचा वचपा काढणार असल्याच्या चर्चा आहेत. आता एकनाथ शिंदेंविरोधात अभिजित पानसेंना रिंगणात उतरवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


तर कोपरीतून माघार घेणार?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून त्या मतदारसंघात मनसेचे अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्याबाबतच्या चर्चा आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी अमित ठाकरेंच्या उमेदवारीला पाठिंबा दिला, तर शिंदेंविरोधात मनसे उमेदवार देणार नाही, अशीही चर्चा आहे. त्यामुळे आता शिंदे पाठिंबा देणार की मनसे आपला उमेदवार देणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 


नारायण राणे अमित ठाकरेंच्या प्रचाराला जाणार 


माझी राज ठाकरे यांच्याशी चांगली मैत्री असल्याने मी अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी जाईन, असे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे तिघेही याबाबत निर्णय घ्यायला समर्थ आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबाबत अधिक काही बोलणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. 


राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना महायुतीने समर्थन द्यायला हवे - आशीष शेलार 


हिंदुत्वाची भूमिका घेणारे, आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना महायुतीने समर्थन द्यायला हवे, असे आपल्याला वाटत असून यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी (काल) शनिवारी दिली आहे.


माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (ठाकरे) या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्याने येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळे अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याच्या हालचाली महायुतीमध्ये सुरू झाल्या आहेत. आपल्या घरातील अमित ठाकरे निवडणूक लढवत असतील, तर आपणही नातं जपायला हवं अशी भूमिका घेत शेलार यांनी पाठिंब्याचे संकेत दिले आहेत.


 'भले उद्धव ठाकरेंना वाटत नसेल, तरी महायुतीने नाते जपायला हवे. सदा सरवणकर यांना आमचा विरोध नाही. पण, महायुती म्हणून सगळ्यांनी एक चांगली राजकीय भूमिका घ्यावी. त्यातून जनतेत एक संदेश जाईल', अशी भूमिका भाजप नेते आशीष शेलार यांनी मांडली.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI