MAH CET 2022 Registration : महाराष्ट्र CET LLB 2022 साठी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. 19 मार्च 2022 पासून महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या पाच वर्षांच्या कायदा अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेसाठी (MHT CET 2022) cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करता येईल. इच्छुक उमेदवार येथे अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2022 आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.


पाच वर्षांसाठी MAH CET 2022 चा अर्ज नोंदणी शुल्क भरल्यानंतरच स्वीकारला जाईल. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील खुल्या श्रेणी आणि ईडब्ल्यूएससाठी शुल्क 800 रुपये असून इतर सर्व वर्गांसाठी 600 रुपये अर्जाची फी आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. उमेदवारांच्या सोयीसाठी अर्ज कसा करावा याची सोपी प्रक्रिया येथे सांगतली आहे, याचे अनुसरण करून उमेदवार फॉर्म भरू शकतात.


महत्त्वाच्या तारखा :



  • महाराष्ट्र CET LLB परीक्षा नोंदणी सुरू : मार्च 19, 2022

  • महाराष्ट्र CET LLB परीक्षा नोंदणी संपेल : 7 एप्रिल 2022

  • महाराष्ट्र CET LLB परीक्षा हॉल तिकीट : 30 एप्रिल

  • महाराष्ट्र CET LLB परीक्षेची तारीख : 17, 19 मे, 2022

  • महाराष्ट्र CET LLB परीक्षा निकाल : तारखानंतर जाहीर केल्या जातील.


MAH LLB CET 2022 साठी नोंदणी कशी करावी?



  • सर्वप्रथम mahacet.org अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • त्यानंतर MAH-LLB (5 वर्षे) CET-2022 (Integrated Course) या लिंकवर क्लिक करा.

  • आता 'नवीन नोंदणी' पर्याय निवडा.

  • त्यानंतर तपशील भरून आपली नोंदणी करा.

  • अर्ज फी भरा आणि पुढे जा.

  • फॉर्म सेव्ह करा आणि सबमिट करा.

  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.


कोण अर्ज करू शकतो
MAH CET 2022 प्रवेश परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थेतून SSC आणि HSC परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा भारतातील किंवा बाहेरील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI