JEE Mains Result 2022 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई (मुख्य) च्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर करण्यासोबत टॉपर्सची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, JEE Mains 2022 मध्ये एकूण 14 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. दरम्यान, काल जेईई मेन परीक्षेचा निकाल (JEE Main Result 2022) जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहू शकतात.
झारखंड (Jharkhand) रांची (Ranchi) मधील कुशाग्र श्रीवास्तव (Kushagra Srivastava) यानं IIT JEE Mains 2022 मध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या मते, JEE (Mains) - 2022 परीक्षेच्या दोन्ही सत्रांनंतर उमेदवारांची श्रेणी तयार केली जाते. 100 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हरियाणातील सार्थक माहेश्वरी, तेलंगणातील अनिकेत चट्टोपाध्याय, तेलंगणातील धीरज, आंध्र प्रदेशातील कोयन्ना सुहास, झारखंडमधील कुशाग्र श्रीवास्तव, पंजाबमधील मृणाल गर्ग, आसाममधील स्नेहा पारीक, राजस्थानमधील नव्या यांचा समावेश आहे. कुशाग्रने 100 टक्के गुण मिळवून राज्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा गौरव केला आहे. कुशाग्रच्या या यशावर कुटुंबीय अत्यंत आनंदी आहेत.
कुशाग्रला इतके गुण मिळाले
कुशाग्रने भौतिकशास्त्रात 99.94, रसायनशास्त्रात 100 आणि गणितात 99.9 गुण मिळवले आहेत. जेईई मेनमध्ये चांगले प्रदर्शन करणारे विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्डसाठी बसू शकतील. जेईई अॅडव्हान्स्डमध्ये चांगली रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देशभरातील आयआयटीसह देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळेल.
100 टक्के गुण मिळवणाऱ्या 14 विद्यार्थ्यांची नावं
- जस्ति यशवंत वी वी एस, तेलंगाणा
- सार्थक माहेश्वरी, हरियाणा
- अनिकेत चट्टोपाध्याय, तेलंगाणा
- धीरज कुरुकुंडा, तेलंगाणा
- कोय्याना सुहास, आंध्रप्रदेश
- कुशाग्र श्रीवास्तव, झारखंड
- मृणाल गर्ग, पंजाब
- स्नेहा पारीक, असाम
- नव्या, राजस्थान
- पेनिकलपति रवि किशोर, आंध्रप्रदेश
- पोलीसेटी कार्तिकेय, आंध्रप्रदेश
- बोया हरेन सात्विक, कर्नाटक
- सौमित्र गर्ग, उत्तरप्रदेश
- रूपेश बियाणी, तेलंगाणा
जेईई मेनचा निकाल कसा तपासाल? (Check JEE Main Result 2022)
- स्टेप 1 : विद्यार्थ्यांना jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
- स्टेप 2 : वेबसाईटवरील होमपेजवर JEE Main Result 2022 या निकालासाठीच्या लिंकवर क्लिक करा.
- स्टेप 3 : यानंतर विद्यार्थ्याने आयडी आणि पासवर्ढ प्रविष्ट करावा.
- स्टेप 4 : यानंतर तुम्हाला तुमचा निकाल ऑनलाईन पाहता येईल.
- स्टेप 5 : विद्याथी निकाल डाउनलोड करु शकतात.
- स्टेप 6 : गरजेनुसार विद्यार्थी निकालाची प्रिंटही काढू शकतात.
जेईई मेन सत्र 2 ची परीक्षा कधी?
जेईई मेन सत्र 2 ची परीक्षा 21 जुलै ते 30 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
JEE Main Result : जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर, jeemain.nta.nic.in वर पाहा निकाल
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI