NTA Changes JEE Main 2023 Schedule : आयआयटी, एनआयटीसह इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा जेईई मेन्ससंदर्भात एक मोठं अपडेट आलं आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने JEE Mains परीक्षा सुरु होण्याच्या अवघ्या चार दिवस आधीच वेळापत्रकात मोठा बदल केला आहे. JEE Mains 2023 च्या परीक्षेची तारीख बदलली आहे. NTA ने यासंदर्भात अधिकृत अधिसूचनाही जारी केली आहे. 


NTA ने ज्वॉइंट एन्ट्रंस एक्झामिनेशन 2023 चं वेळापत्रक बदललं असून आधी जी परीक्षा 27 जानेवारी रोजी होणार होती, तिच परीक्षा आता 28 जानेवारी रोजी होणार आहे. आता जेईई मुख्य परीक्षा 27 जानेवारी 2023 रोजी होणार नाही. जुन्या वेळापत्रकानुसार जेईई मुख्य परीक्षा 24, 25, 27, 28, 29, 30 आणि 31 जानेवारी रोजी होणार होती. आता त्याऐवजी परीक्षा एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. 


नवं वेळापत्रक 


नवीन वेळापत्रकानुसार आता 24, 25, 28, 29, 30 आणि 31 जानेवारी ते 01 फेब्रुवारी 2023 या कालावधीत परीक्षा होणार आहे. म्हणजेच, 27 जानेवारीला कोणतीही परीक्षा होणार नाही. तर, 27 तारखेला होणारी परीक्षा 28 जानेवारीला होणार आहे. 


NTA JEE Main ची अधिकृत वेबसाईट, jeemain.nta.nic.in वर जारी करण्यात आलेल्या नोटीसनुसार, जेईई मेन्स जानेवारीच्या परीक्षेत आणखी एक दिवस जोडण्यात आला आहे. यापूर्वी ही परीक्षा 31 जानेवारी 2023 रोजी संपणार होती, आता ती 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत सुरु राहिल. परीक्षा सुरु होण्याच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. NTA, JEE मुख्य परीक्षा आधीच निश्चित केलेल्या JEE मुख्य परीक्षेच्या तारखेपासून म्हणजेच, 24 जानेवारी 2023 पासून सुरु होईल.


NTA ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता JEE मेन्स 2023 प्रथम सत्र परीक्षा 24, 25, 28, 29, 30, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी 2023 (जेईई मुख्य पेपर 1 परीक्षा दोन शिफ्टमध्ये BE आणि BTech साठी) घेतली जाईल. याशिवाय, BAarch आणि Biplanning म्हणजेच JEE मेन पेपर 2 ची परीक्षा 28 जानेवारीला दुसऱ्या शिफ्टमध्ये घेतली जाईल.


JEE Mains Exam City Slip डाऊनलोड कशी कराल? 


NTA ने JEE Main जानेवारी 2023 परीक्षेची City Slip देखील जारी केली आहे. ही परीक्षा देशातील 290 आणि परदेशातील 25 शहरांमध्ये होणार आहे. जर तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज केला असेल, तर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवरुन परीक्षा सिटी स्लिप डाऊनलोड करता येईल. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI