JEE Answer Key: जर तुम्ही जेईई मेन सेशन II ही परीक्षा दिली असेल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. कारण, NTA ने संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) ची प्रोविजनल Answer Key जारी केली आहे. जे उमेदवार परीक्षेत बसले होते ते अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाऊन तपासू शकतात.



प्रति प्रश्न 200 रुपये शुल्क
JEE सत्र 2 ची मुख्य परीक्षा 25 जुलै ते 30 जुलै 2022 या कालावधीत झाली. ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेण्यात आली. उमेदवार पेपर 1(B.E./B.Tech.), पेपर 2A (B.Arch), आणि पेपर 2B (B.Planning) च्या Answer Key तपासू शकतात. जे उमेदवार Answer Key वर समाधानी नाहीत ते 5 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत Answer Key वर आक्षेप नोंदवू शकतात. यासाठी उमेदवारांना शुल्क भरावे लागेल. आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना प्रति प्रश्न 200 रुपये शुल्क म्हणून भरावे लागतील



JEE मेन सेशन सत्र-II Answer Key: आक्षेप कसा नोंदवाल?


1: सर्व उमेदवार प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट द्यावी.
2: त्यानंतर उमेदवाराच्या मेन पेजवर Answer Key संबंधित "चॅलेंज" या लिंकवर क्लिक करा.
3: आता उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
4: त्यानंतर उमेदवार आयडी निवडा आणि आक्षेप सबमिट करा.
5: आता उमेदवाराने फी भरावी.


 


 


 


 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI