मुंबई : आयआयटी (IIT), एनआयटी (NIT) आणि इतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्स 2024 (JEE Main 2024) परीक्षा नोंदणीची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत. जेईई मेन्स 2024 (JEE Main 2024) परीक्षेबद्दल नवीन अपडेट जाणून घ्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सी जेईई मेन्स 2024 साठी (JEE Main 2024 Registration) परीक्षेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु जर आपण मागील वर्षांचा कल पाहिला तर आपण परीक्षेच्या तात्पुरत्या तारखांचा अंदाज करू शकतो. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA लवकरच JEE मेन 2024 साठी नोंदणी सुरू करेल.


जेईई मेन्स 2024 नोंदणी कधी सुरू होईल?


मीडिया रिपोर्टनुसार, जेईई मेन 2024 साठी नोंदणी डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येऊ शकते. अधिकृत तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. पण, अंदाज पाहता जेईई मेन 2024 साठी नोंदणी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊ शकते.


जेईई मेन्स 2024 परीक्षेची तारीख


जेईई मेन्स 2024 परीक्षेची नोंदणी डिसेंबर महिन्यात सुरू होणं अपेक्षित आहे. तर, नोंदणीसाठीची शेवटची तारीख जानेवारी 2024 असू शकते. त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म दुरुस्तीची शेवटची तारीख जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात असू शकते. यानुसार, जेईई मेन 2024 परीक्षा फेब्रुवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे.


जेईई मेन्स 2024 परीक्षेसाठी कोण अर्ज करू शकतात?


पीसीएम (PCM) विषयासह बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवारच या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराकडे भौतिकशास्त्र (Physics) आणि गणित (Maths) विषय असणं आवश्यक आहे. जेईईमध्ये चांगले रँक मिळवणारे जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेला बसू शकतात.


'या' वेबसाइटवर लक्ष ठेवा


जेईई मेन्स परीक्षा 2023 साठी अर्ज फक्त ऑनलाइन करता येतात. यासाठी तुम्हाला JEE Main च्या jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. या संकेतस्थळावरून अर्ज केले जातील आणि परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती येथूनही मिळू शकेल. नवीन अपडेटसाठी वेळोवेळी वेबसाईट तपासत रहा.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kota Student Sucide: 'सुसाईडचा कोटा पॅटर्न; 24 तासांत दोन तर वर्षभरात 23 विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या ताणामुळे आत्महत्या


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI