JEE Advanced 2022 Exam: जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या JEE परीक्षेची प्रवेशपत्रे लवकरच जारी केली जातील. जे विद्यार्थी अधिकृत साइट jeeadv.ac.in वर जाऊन डाउनलोड करू शकतील.
दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार परीक्षा
JEE Advanced 2022 (JEE Advanced 2022) परीक्षा 28 ऑगस्टला होणार आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाणार आहे. पेपर 1 हा सकाळच्या शिफ्टमध्ये सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होईल. तर पेपर 2 दुपारच्या शिफ्टमध्ये घेण्यात येईल. ही परीक्षा दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत होणार आहे.
JEE Advanced 2022 Admit Card 2022: महत्वाच्या तारखा
नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 8 ऑगस्ट 2022
नोंदणी प्रक्रियेची अंतिम तारीख: 11 ऑगस्ट 2022
अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2022
परीक्षेसाठी प्रवेशपत्राची उपलब्धता: 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2022
JEE Advanced 2022 परीक्षेची तारीख: 28 ऑगस्ट 2022
प्रोविजनल आंसर की 3 सप्टेंबर 2022
फाइनल आंसर की : 11 सप्टेंबर 2022
JEE Advanced 2022 चा निकाल जाहीर करण्याची तारीख: 11 सप्टेंबर 2022
JEE Advanced 2022 Admit Card 2022: Admit Card कसे डाउनलोड करायचे?
1: प्रथम उमेदवार अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in ला भेट द्या
2: त्यानंतर उमेदवारांना होमपेजवर प्रवेशपत्राची लिंक दिसेल
3: आता उमेदवार त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स एंटर करू शकतात आणि लॉग इन करू शकता
4: यानंतर, JEE Advanced 2022 साठी उमेदवाराचे प्रवेशपत्र स्क्रीनवर दाखवले जाईल.
5: आता उमेदवाराचे प्रवेशपत्र डाउनलोड करा
6: शेवटी, उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंट आउट घ्यावी.
IIT Bombay नं वाढवली मुदत
इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे (IIT Bombay) जेईई अॅडव्हान्ससाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) अॅडव्हान्स 2022 साठी नोंदणीची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांना आणखी एक संधी आहे. II Bombay नं अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि वेळ पुढे ढकलली आहे. उमेदवार आता 12 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेपर्यंत अधिकृत वेबसाइट jeeadv.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. JEE Advanced 2022 ची परीक्षा 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. JEE Advanced साठी रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख 11 ऑगस्ट 2022 होती. आता ती 12 ऑगस्ट रात्री 8 वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी कोण पात्र असेल
जेईई मेन 2022 अंतिम गुणवत्ता यादीमध्ये टॉप 2,50,000 रँकमध्ये समाविष्ट असलेले विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षा 2022 साठी पात्र असतील. जर दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांची रँक आणि गुण समान असतील तर 2.50 लाखांचा हा आकडा थोडा जास्त असू शकतो. जेईई मेनचे निकाल जाहीर झाले आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI