HSC-SSC Result: सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाचा बारावीचा निकाल नुकताच लागला. याचसोबत बहुतांश मोठ्या राज्यांचे बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परीक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावी बोर्डाचा निकाल मे महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा जूनचा पहिला आठवड्यात तर दहावी बोर्ड (SSC Board) परीक्षेचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे


बारावीच्या सर्वच शाखांची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च यादरम्यान पार पडली. मागील दोन वर्ष कोरोना लॉकडाउनमुळे दहावी बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली.  उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं संकलन, शिक्षक संघटनांचा  संप, प्रश्नपत्रिकेचा घोळ, पेपरफुटी,  यामध्ये बऱ्याच अडचणी आल्या. असे असले तरी दहावी बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणार आहे.  बा


यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी  राज्यातून बारावीच्या परीक्षेला 15 लाख 5 हजार 27विद्यार्थी बसले आहेत.  राज्यातील जवळपास 3195 परीक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परीक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते.  तर  दहावीची लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत झाली. यंदा 23 हजार 10 शाळांमधील 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.  आता या परिक्षेचा निकाल कधी लागतो याची उत्सुकता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे.


बारावीच्या निकालासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून विविध तारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहान बोर्डाकडून केलं गेलं. निकाल ज्या दिवशी असतो त्याच्या एक दिवस आधीच बोर्डाकडून निकालाची तारीख आणि वेळ अधिकृतपणे जाहीर करण्यात येते. तसंच हा निकाल विद्यार्थी कुठे बघू शकतात याचीही माहीती बोर्डाकडून जाहीर करण्यात येते. यामुळे यावर्षीही बारावीच्या निकालाची तारिख दरवर्षीप्रमाणे अधिकृतपणे कळविण्यात येईल असं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. विद्यार्थी बोर्डाच्या वेबसाईटवर भेट देऊन निकाल पाहू शकतात. सोबतच एबीपी माझा वेबसाईटवरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. 


हे ही वाचा :


शिक्षण विभागात खळबळ! बारावी भौतिकशास्त्राच्या 372 उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर; चौकशी समितीचा अहवाल


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI